Uddhav Thackeray : सहा महिन्यांपूर्वी गौरी भिडे यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीची मागणी करणारी ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिका फेटाळताना न्यायालयाने भिडे यांना 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.
या संदर्भात गौरी भिडे यांनी सबळ पुरावा दाखल करू शकल्या नाहीत. परिणामी न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप सिद्ध करण्यात ते अपयशी ठरले आहेत. यामुळे न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
ठाकरें कुटुंबीयांविरोधातील आरोप सिद्ध करण्यात याचिका कर्ते कमी पडले, असे मत न्यायालयाने नोंदवले. दरम्यान, गौरी भिडे व्यवसायाने प्रकाशक आहेत. राजमुद्रा नावाची त्यांची प्रकाशन संस्था आहे. त्यांनी सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी संपत्ती गोळा करणं अशक्य असल्याचा आरोप केला होता.
त्यांनी असे म्हटले होते की, आपलाही हाच व्यवसाय आहे. या व्यवसायाची आपणास चांगली माहिती आहे. त्यामुळे दोघांच्या उत्पन्नात एवढा फरक कसा? यामुळे त्यांनी याचिका दाखल केली होती.
ठाकरे कुटुंबीयांनी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानासमोर आकरा मजली इमारत बांधली आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या अलिशान गाड्या. या सर्व गोष्टींचा आर्थिक ताळेबंद लागत नाही. मिळकतीपेक्षा जास्त उत्पन्न कसे काय? असा सवाल त्यांनी याचिकेत विचारला होता.