Udhhav Tackeray Candidate List : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
महायुती मधील या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांची पहिली यादी समोर आली आहे. परंतु महाविकास आघाडीमध्ये अजूनच जागा वाटपावर अंतिम निर्णय झालेला नसल्याचे दिसते. कारण की महा विकास आघाडीमधील कोणत्याच पक्षाकडून अजून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही.
पण, शरद पवार गटाने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाने देखील आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मातोश्रीवर आतापर्यंत 40 जणांना एबी फॉर्म चे वाटप करण्यात आले आहे.
अर्थातच या चाळीस लोकांना फिक्स उमेदवारी मिळणार आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदार संघासाठी सुद्धा एबी फॉर्म चे वाटप करण्यात आले आहे. विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांना ठाकरे गटाने एबी फॉर्म दिला आहे.
अर्थातच नेवासा विधानसभा मतदारसंघातून यंदाही शंकरराव गडाख हे उमेदवारी करताना आपल्याला दिसणार आहेत. अशा परिस्थितीत, आता आपण ठाकरे गटाने कोणाकोणाला बेबी फॉर्मचे वाटप केले आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
ठाकरे गट कोणाला उमेदवारी देणार
शंकरराव गडाख – नेवासा
सुधाकर बडगुजर(नाशिक पश्चिम)
वसंत गिते(नाशिक मध्य)
अद्वय हिरे (मालेगाव बाह्य)
एकनाथ पवार (लोहा कंधार)
के पी पाटील, राधानगरी विधानसभा
बाळ माने, रत्नागिरी विधानसभा
उदेश पाटेकर, मागाठाणे विधानसभा
अमर पाटील, सोलापूर दक्षिण
गणेश धात्रक, नांदगाव
दीपक आबा साळुंखे पाटील, सांगोला
प्रविणा मोरजकर, कुर्ला
एम के मढवी, ऐरोली
भास्कर जाधव, गुहागर
वैभव नाईक, कुडाळ
राजन साळवी, राजापूर लांजा
आदित्य ठाकरे, वरळी
संजय पोतनीस, कलिना
सुनील प्रभू, दिंडोशी
राजन विचारे, ठाणे शहर
दीपेश म्हात्रे, डोंबिवली
कैलास पाटील, धाराशिव
मनोहर भोईर, उरण
महेश सावंत, माहीम
श्रद्धा जाधव, वडाळा
पाचोरा – वैशाली सूर्यवंशी
नितीन देशमुख – बाळापूर
किशनचंद तनवाणी – छत्रपती संभाजी नगर मध्ये
छत्रपती संभाजीनगर पश्चिम – राजू शिंदे
वैजापूर मतदारसंघ – दिनेश परदेशी
कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत
सिल्लोड मतदारसंघ – सुरेश बनकर
राहुल पाटील – परभणी
सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
सुनील राऊत – विक्रोळी
रमेश कोरगावकर भांडुप पश्चिम
उन्मेश पाटील – चाळीसगाव
स्नेहल जगताप – महाड
ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
केदार दिघे- कोपरी पाचपाखाडी