Ahmednagar Politcs : विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली झंजावात सुरु ! उद्या नगरमध्ये महायुतीचा मेळावा, विखे पाटलांनी घेतली ‘ही’ शपथ…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Politcs

Ahmednagar Politcs : राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीचे मेळावे उद्या (ता. 14 जानेवारी) राज्यभर आयोजित करण्यात आले आहेत. हे मेळावे यशस्वी करण्याची जबाबदारी राज्यातील 25 मंत्र्यांसह प्रमुख 52 नेत्यांवर सोपवली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातही उद्या मेळावा होणार असून यांची जबाबदारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याबाबत खा. सुजय विखे व आ. संग्राम जगताप यांनी आज (१३ जानेवारी) पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड, शिवसेनेचे बाबुशेठ टायरवाले, उत्तर नगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कपिल पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

कुठे व कधी आहे मेळावा?

१४ जानेवारी सकाळी ११ वाजता शहरातील बंधन लॉन्स कार्यालयात हा महाविजय २०२४ हा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व आजी-माजी आमदार त्याप्रमाणे पक्षाचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे सर्व आजी-माजी आमदार, तसेच महापालिकेचे माजी पदाधिकारी, नगरसेवक यांच्या सह शिवसेनेचे (शिंदे) जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकार्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे.

 काय म्हणाले खा. सुजय विखे

महायुतीच्या मेळाव्यातून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या निर्णयावर घटक पक्ष निर्धार करतील असा विश्वास खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. या मेळाव्यास महायुतीतील घटक पक्ष असतील. याची जय्यत तयारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार करतानाच राज्यात ४५ हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवून महायुती काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री विखे पाटील यांच्या नगर आणि श्रीरामपूर येथे घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेवून महामेळाव्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

रविवारच्या मेळाव्यात सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगून महायुती मध्ये चांगला समन्वय असल्याचे खा.विखे पाटील याची सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात ‘४५ प्लस खासदार’ असतीलच असे सूतोवाच करत या मिशनमध्ये नगरकरांचे जास्त योगदान राहील असा विश्वासच व्यक्त केला.

काय म्हणाले आ. जगताप आ.जगताप

म्हणाले की,राज्यातून लोकसभा निवडणुकीत ४५ जागा विजयी करण्याचा निर्धार करतानाच यासाठी जिल्हा स्तरावर समन्वय समिती नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळात एकत्रितपणे महायुतीतील सर्व घटक पक्ष नियोजन करणार असल्याचे त्याची सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe