विधानसभा निवडणूक 2024 : वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी रंगतदार लढत होणार ?

Tejas B Shelar
Published:
Vidhansabha Nivdnuk 2024

Vidhansabha Nivdnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकींकडे. विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार ? हाच मोठा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. राजकीय पक्ष आणि नेते देखील निवडणुकांच्या तारखांकडे नजर रोखून आहेत. मात्र पुढल्या महिन्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे राजकीय वातावरण तापणे स्वाभाविक आहे. यानुसार सध्या संपूर्ण राज्यभर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून घमासान पाहायला मिळत आहे. या साऱ्या गोष्टी अजून बंद दाराआड आहेत. मात्र लवकरच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुरू असणारा जागा वाटपावरील गदारोळ चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

अशातच आता वरळी विधानसभा मतदारसंघासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. वरळी हा एक हाय प्रोफाईल मतदारसंघ आहे. येथून माजी मुख्यमंत्री आणि उबाठा शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आमदार आहेत.

मात्र आता या हाय प्रोफाईल मतदारसंघात एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळू शकतो असे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत ठाकरे ब्रदर्स आपापसात लढणार आहेत. या मतदारसंघात प्रथमच ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी रंगतदार लढत पाहायला मिळू शकते अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आव्हान देणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र राजकीय वर्तुळात सुरू असणाऱ्या या चर्चांना आता मनसे कडून दुजोरा मिळत आहेत.

मनसेने अमित ठाकरे यांचे वरळी मधून लॉन्चिंग होणार असे संकेत दिले आहेत. आदित्य ठाकरे यांनी वरळी ए प्लस ही संकल्पना लॉन्च केली याला काउंटर करण्यासाठी म्हणून मनसेने वरळी व्हिजन ही संकल्पना समोर मांडली. याचमुळे अमित ठाकरे हे आदित्य यांना आव्हान देणार अशा चर्चांना बळ मिळू लागले आहे.

मनसेने वरळीकडे अधिक लक्ष केंद्रित केले असल्याने अमित यातूनच निवडणूक लढवणार या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या वरळी व्हिजन या कार्यक्रमाला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पूर्ण पाठिंबा दिला आहे.

हेच कारण आहे की, येत्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना त्यांचे बंधू आणि राजसाहेब यांचे सुपुत्र अमित ठाकरे आव्हान देणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात अधिक तीव्र होत आहेत. खरे तर, संदीप देशपांडे हे मनसे कडून या जागेवरून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पण पक्षाने त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही. दुसरीकडे राजपुत्र वरळी मध्ये जातीने लक्ष घालत आहेत.

वरळी हा नक्कीच उद्धव ठाकरेंचा गड समजला जातो. पण या गडात राज ठाकरेंची सुद्धा मोठी ताकत आहे. यामुळे जर अमित ठाकरे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उभे राहिले तर नक्कीच माजी मंत्री आणि उद्धव पुत्र आदित्य ठाकरे यांना वरळीचा गड राखणे अवघड होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe