‘या’ तारखेच्या आधीच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका पार पडणार! निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची मोठी माहिती

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांच्या माध्यमातून निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच सर्वसामान्य जनतेच्या भेटीगाठी घेत आगामी निवडणुकीसाठी रंगीत तालीम सुरू करण्यात आली आहे. इच्छुक पैलवान आतापासूनच तेल लावून आखाड्यात उतरण्यास सज्ज झाले आहेत.

Tejas B Shelar
Published:
Vidhansabha Nivdnuk 2024

Vidhansabha Nivdnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते आगामी विधानसभा निवडणुकांकडे. यावेळीच्या विधानसभा निवडणुका ह्या नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या माध्यमातून जोरदार मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांच्या माध्यमातून निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच सर्वसामान्य जनतेच्या भेटीगाठी घेत आगामी निवडणुकीसाठी रंगीत तालीम सुरू करण्यात आली आहे. इच्छुक पैलवान आतापासूनच तेल लावून आखाड्यात उतरण्यास सज्ज झाले आहेत.

तथापि, महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अजून निश्चित झालेली नाही. जेव्हा हे जागावाटप निश्चित होईल तेव्हा या दोन्ही गटातील नेत्यांच्या पायाला भिंगरी लागणार आहे आणि प्रचाराला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच महाराष्ट्र दौरा केला आहे. दरम्यान, या दौऱ्यानंतर निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

काय म्हणालेत राजीव कुमार

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत असे सांगितले की, आम्ही राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या भेटी-गाठी घेतल्या आहेत. पोलीस महासंचालक, आयुक्त अशा साऱ्यांची भेट घेतली आहे. आम्ही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत याचे निर्देश दिले आहेत.

यावेळी कुमार यांनी, आम्ही बसपा, आप, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी, शिवसेना उबाठा, भाजपा अशा सगळ्या पक्षांची भेट घेतली आहे. या सर्व पक्षांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत त्यांचे म्हणणे मांडले आहे. यात या सर्व पक्षांनी दिवाळीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

दिवाळीचा सण हा महाराष्ट्र सहित संपूर्ण भारतात साजरा होत असतो. यामुळे निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना दिवाळी सण लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने तारखा जाहीर कराव्यात असे आवाहन अन विनंती या पक्षांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. निवडणुकीच्या तारखा ठरवताना सुट्ट्या विचारात घ्याव्यात असेही या पक्षांच्या माध्यमातून कळवण्यात आले आहे.

या तारखेच्या आधीच होणार निवडणुका

महाराष्ट्राची विधानसभा 26 नोव्हेंबरला विसर्जित होणार आहे. 26 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपत असल्याने या तारखेच्या आधीच महाराष्ट्रात निवडणूक होण्यापेक्षा आहे. दरम्यान राजीव कुमार यांनीदेखील या तारखेच्या आतच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पूर्ण होतील अशी माहिती यावेळी पत्रकारांना दिली आहे.

एकंदरीत 288 मतदारसंघ असणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल हा नोव्हेंबर मध्ये वाचणार आहे. तथापि अजून भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखांची घोषणा केलेली नाही. परंतु 26 नोव्हेंबर च्या आतच निवडणुका होतील असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान याच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा केला असून आगामी काळात निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकांच्या थेट तारखाचं जाहीर केल्या जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe