Vidhansabha Nivdnuk 2024 : केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. राज्यातील विधानसभा 26 नोव्हेंबरला विसर्जित होत आहे. यामुळे त्याआधीच निवडणुका होऊन नवीन सरकार सत्तेवर येणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौरा केला होता.
त्यावेळी लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असे संकेत निवडणूक आयोगाने दिले होते. त्यामुळे आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंद दाराआड जागा वाटपावर खलबत्त सुरू आहे.
पण, अजून दोन्ही गटांमध्ये जागा वाटपावर सहमती बनलेली नाही. अशातच, आता महायुतीच्या खेम्यातून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. महायुती घटस्थापनेच्या मुहूर्तावर आपली पहिली यादी जाहीर करणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
एवढेच नाही तर या पहिल्या यादीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट या तिन्ही पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश असू शकतो असे म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत, आता आपण महायुतीच्या या पहिल्या संभाव्य यादीत कोणत्या नेत्यांना स्थान मिळू शकत याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या पहिल्या यादीत या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते
कोपरी-पाचपाखाडी – एकनाथ शिंदे
महाड – भरत गोगावले
रत्नागिरी – उदय सामंत
जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील
दापोली – योगेश कदम
नांदगाव – सुहास कांदे
सांगोला – शहाजीबापू पाटील
साक्री – मंजुळा गावित
राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाच्या पहिल्या यादीतील उमेदवारांचा समावेश असू शकतो
बारामती – अजित पवार
आंबेगाव – दिलीपराव वळसे पाटील
येवला – छगन भुजबळ
कागल – हसन मुश्रीफ
रायगड – अदिती तटकरे
परळी – धनंजय मुंडे
जुन्नर – अतुल बेनके
मावळ – सुनील शेळके
अहेरी – धर्मरावबाबा आत्राम
खेड – दिलीप मोहिते
उदगीर – संजय बनसोड
भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते
नागपूर दक्षिण पश्चिम- देवेंद्र फडणवीस
कामठी – चंद्रशेखर बावनकुळे
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
जामनेर – गिरीश महाजन
काटोल – आशिष देशमुख
सिंदखेड राजा -जयकुमार रावल
माण-खटाव – जयकुमार गोरे
माळशिरस – राम सातपुते
जिंतूर सेलू – मेघना बोर्डीकर
चिखली- श्वेता महाले
मंडळी, वर दिलेली ही यादी महायुतीच्या घटक पक्षांची अधिकृत यादी नाही. ही फक्त संभाव्य उमेदवारांची नावे आहेत. या उमेदवारांची नावे यादीत असू शकतात असा अंदाज आहे. यामुळे, प्रत्यक्षात जेव्हा महायुतीकडून त्यांची अधिकृत यादी समोर येईल तेव्हाच महायुतीकडून कोणाला संधी मिळणार? हे स्पष्ट होणार आहे.