Ahmednagar Politics : दक्षिणेतील विखे पिता – पुत्रांचे दहशतीचे झाकण उडवणार ! काँग्रेसचे बाळासाहेब थोरात लोकसभा लढवणार ?

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसकडे घ्यावा. हा पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ आहे. देशात भाजप विरोधी जनमत निर्माण झाले आहे. राहुल गांधीच देशाचे सक्षमपणे नेतृत्व करू शकतात अशी जनभावना तयार झाली आहे.

भाजपला विकास करता आलेला नाही. महागाई, बेरोजगारी, सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम चालू आहे. दक्षिणची जागा काँग्रेस जिंकेल असे म्हणत माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरातांना उमेदवार करण्याची एकमुखी मागणी नगर शहरासह दक्षिणेतील सर्वच तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी निरीक्षक माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरेंकडे केली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना मी कोअर कमिटी समोर मांडणार असल्याचे यावेळी हांडोरे म्हणाले.

दक्षिणेची आढावा बैठक नगर शहरात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. हंडोरे झाले की, दक्षिणेची जागा काँग्रेसने लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. राज्याचे नेते आणि माझे सहकारी बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून ही जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी आम्ही टोकाचा आग्रह धरू.

त्यासाठी मित्र पक्षांशी ही आम्ही चर्चा करू. त्यांना समजावून सांगू. आ. लहू कानडे म्हणाले, ही काँग्रेसची सुवर्णभूमी आहे. ज्यांना काँग्रेसने भरभरून दिले त्यांनीच ताटात छेद केला. जिल्ह्यातील काँग्रेस थोरातांनी सांभाळली अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांना आधार दिला. जिल्ह्यातील दोन्ही जागा पक्षाने लढवाव्यात.

विखे पिता – पुत्रांचे दक्षिणेतील दहशतीचे झाकण उडवू : काळे

गणेश कारखान्याच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली सभासदांनी चमत्कार घडवून दाखवला. विखे पिता-पुत्रांच्या दहशतीचे झाकण त्यांनी उडविले. काँग्रेसने दक्षिणेकडे लोकसभेची जागा घेऊन श्रेष्ठींनी थोरातांना उमेदवार दिल्यास शहरातील आमदारांच्या दहशतीसह विखेंचे ही प्रशासनाच्या दुरुपयोगाच्या माध्यमातून असणारे दक्षिणेतील दहशतीचे झाकण मतदारांच्या मदतीने काँग्रेस कार्यकर्ते कायमचे उडवतील असा हल्लाबोल शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी मंत्री ना.राधाकृष्ण विखे, खा.सुजय विखे यांच्यावर केला.

ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, दक्षिणची जागा काँग्रेस नक्की जिंकेल. थोरातांची सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची प्रतिमा, महाविकास आघाडीला असणारे समर्थन यामुळे विजय खेचून आणता येईल. वीरेंद्र किराड म्हणाले, शहरासह जिल्ह्यात काँग्रेस अधिक बळकट करायची आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी कार्यकर्त्यांनी आत्ता पासूनच सुरू करावी.

शहराच्या जागेवर ही दावा :

मनोज गुंदेचा, संजय झिंजे, सुनील क्षेत्रे यांच्यासह शहरातील कार्यकर्त्यांनी यावेळी लोकसभेला बाळासाहेब थोरात तर विधानसभेला शहरातून किरण काळेंना उमेदवार करण्याची जोरदार मागणी करत शहराच्याही जागेवर दावा केला.

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार हे भाजपबरोबर गेले आहेत. यापूर्वी आ.थोरातांनी स्वतःच किरण काळे शहराचे आमदार होतील असे जाहीर भाष्य केले आहे. थोरात यांची भविष्यवाणी नगरकर खरी करून दाखवतील, असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी निरीक्षक हंडोरें समोर व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe