थोरातांच्या बालेकिल्ल्यात मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते ५४ कोटी रूपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन !

संगमनेर म्हटलं की आमदार बाळासाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात म्हटलं की संगमनेर हे येथील राजकीय समीकरण आहे. संगमनेरात आजपर्यंत थोरात यांना कोणीच टक्कर देऊ शकलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना संगमनेरात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे आव्हान देणार आहेत.

Tejas B Shelar
Updated:
Vikhe Patil News

Vikhe Patil News : लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातही इच्छुकांच्या माध्यमातून तयारी सुरू झाली आहे.

संगमनेर म्हटलं की आमदार बाळासाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात म्हटलं की संगमनेर हे येथील राजकीय समीकरण आहे. संगमनेरात आजपर्यंत थोरात यांना कोणीच टक्कर देऊ शकलेले नाही ही वस्तुस्थिती आहे.

यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना संगमनेरात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे आव्हान देणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांची नावे अजून फायनल झालेली नाहीत मात्र सुजय विखे पाटील हे इथून निवडणूक लढू शकतात असे संकेत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समोर येत आहेत.

स्वतः सुजय विखे पाटील हे देखील येथून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. मंत्री विखे पाटील यांनी सुद्धा सुजय विखे पाटील हे संगमनेरातून दंड थोपटताना दिसू शकतात असे संकेत दिलेले आहेत. यामुळे मंत्री विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे संगमनेरमधील दौरे वाढले आहेत.

दरम्यान, काल अर्थातच 13 ऑक्टोबरला मंत्री विखे पाटील हे तालुक्यासाठी महायुती सरकारने मंजूर केलेल्या सुमारे ५४ कोटी रूपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन तसेच नारीशक्ती सन्मान सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना विखे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी, हरियाणातील बहीणीनी काँग्रेस नेत्यांना घरचा रस्ता दाखवलाय, आता राज्यातही लाडकी बहीण योजना बंद करण्याची भाषा करणाऱ्यांना दारात उभे करू नका.

महायुती सरकार लाडक्या भाऊ बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व योजनांच्या लाभार्थीना पटापट पैसे देण्याचे काम होत आहे, असं म्हणतं विरोधकांवर हल्ला चढवला आहे. पुढे बोलताना त्यांनी लाडकी बहिण योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करणारी आहे.

या योजनेपासून ज्या महिला वंचित राहिल्या असतील त्यांना सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांचे पैसे आगामी काळात मिळतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच, या योजनेतून संगमनेर तालुक्यासाठी 101 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

विखे यांनी कोण-कोणत्या विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले

पालकमंत्र्यांच्या हस्ते काल जनजीवन जीवन मिशनच्या १५ कोर्टीच्या कामांचे लोकार्पण झाले. काही महिला बचतगटांना प्रातिनिधिक स्वरूपात फुड प्रोसेसिंग युनिटचे वाटप करण्यात आले. बांधकाम कामगार आवश्यक साधने व उपकरणे वाटप या योजनेतील ४०० लाभार्थ्यांपैकी एका कामगारांला प्रातिनिधिक स्वरूपात साहित्य वाटप झाले.

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. महिला बचतगटांना प्रातिनिधिक स्वरूपात बँक कर्जाचे वाटप करण्यात आले. दशक्रीया विधी घाटासाठी सुमारे ४० लाख रुपयांचा निधी मंत्री विखे यांनी मंजूर केला असून याचेही भूमिपूजन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe