विखे-राऊतांची टोलवाटोलवी ! “राऊत यांची वेड्यांच्या रुग्णालयात रवानगी करावी..”, राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर विखे पाटलांची जहरी टीका

Ahmednagar News

Sanjay Raut Vs Vikhe Patil : शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत हे आपला नासिक दौरा आपटून शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात महत्त्वाची अपडेट दिली. त्यांनी नगर दक्षिणमधून राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख उभे राहणार असे संकेत दिले आहेत.

या जागेसाठी गडाख हे लोकप्रिय, योग्य आणि प्रबल दावेदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. म्हणजेच नगर दक्षिण मधून येत्या लोकसभेच्या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांच्या विरोधात शंकरराव गडाख उभे राहणार आहेत. खरे तर नगर दक्षिण मधून सध्या सुजय विखे पाटील हे खासदार आहेत. विशेष म्हणजे महायुतीकडून यावेळी सुजय विखे पाटलांनाच तिकीट मिळणार अशा चर्चा आहेत.

यामुळे जर आघाडीकडून शंकरराव गडाख उभे राहिलेत तर सुजय विखे विरुद्ध गडाख अशी या जागेची लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान शिर्डीमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी महसूल मंत्री विखे पाटील यांची फिरकी घेतली. राऊत यांनी महसूल मंत्री विखे पाटील यांना आमसूल मंत्री म्हणून डिवचलं आहे. विखे पाटील महसूल नाही तर आमसुल मंत्री आहेत असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

विशेष म्हणजे राऊतांच्या या वक्तव्याचा विखे पाटलांनी देखील खरपून समाचार घेतला आहे. पाटलांनी संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून लवकरच त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करावे लागणार असल्याची जहरी टीका केली आहे आहे. तसेच विखे पाटील पुढे म्हणालेत की, राऊत यांनी आजवर अनेक लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सहभाग घेत त्यांची आयुष्य उध्वस्त केली आहेत, याची यादीही मी जाहीर करू शकतो. नगर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली.

या बैठकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित होते. ही बैठक संपन्न झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यावेळीच प्रावतांवर ही जहरी टीका केली. एकंदरीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये सध्या टोलवाटोलवी पाहायला मिळत आहे. राजकीय नेते एकमेकांवर कठोर शब्दात टीका करू लागले आहेत. यामुळे आता लोकसभा जवळ आली आहे हे समजू लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe