Maharashtra News : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच गरमागरम झाल आहे. आगामी लोकसभेच्या हिशोबाने प्रत्येक जण फिल्डिंग लावताना दिसत आहे. दरम्यान महाराष्ट्रात लोकसभेनंतर लगेचच विधानसभा निवडणुका होतील.
त्याअनुशंघाने देखील आता राजकीय वातावरण चांगलेच आपले आहे. आगामी धोरणानुसार सगळेच फिल्डिंग लावू लागले आहेत. परंतु सध्या यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव जास्त चर्चेत येऊ लागले आहे.
त्यांनी सध्या वरपर्यंत लावलेली फिल्डिंग, सर्वपक्षीयांसोबत असणाऱ्या बैठका यामुळे ते सध्या मुख्यमंत्री पदाची तयारी करतायेत का अशी चर्चा रंगली आहे.
ही चर्चा एकीकडे होत असतानाच आता राज्यातील एका वरिष्ठ नेत्याने विखे पाटील व मुख्यमंत्री पद याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे याबाबत खमंग चर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात रंगलेली पाहायला मिळत आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होणार होते मंत्री
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांचा राजीनामा घेत तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झालेला होता. २०१४ साली चव्हाण यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला जाणार होता व राधाकृष्ण विखे पाटील यांना संधी दिली जाणार होती.
यासोबतच बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील ही नावेही चर्चेत होती, पण यात राधाकृष्ण विखे यांचे नाव आघाडीवर होते असा खळबळजनक खुलासा या वरिष्ठ नेत्याने केला आहे.
राष्ट्रवादीचाही होता हिरवा कंदील
२०१४ साली आषाढी एकादशीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा राजीनामा घेण्यासाठी दिल्ली दरबारी हालचाली सुरू होत्या. मुख्यमंत्री असल्याने चव्हाण यांनी आषाढी एकादशीची पूजा केली आणि त्यांनी थेट दिल्लीला प्रस्थान केले. तेथे त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली,
त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय मावळला गेला. विखे पाटील हे सुद्धा त्याच काळात मुख्यमंत्रीपद मिळण्याच्या आशेने दिल्लीत तळ ठोकून फिल्डिंग लावत होते. तशी राजकीय जुळवाजूळवही त्यांनी केलेली होती. विशेष म्हणेज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आणि चव्हाण यांचे राजकीय संबंध ताणले असल्याने राष्ट्रवादीनेही विखे याना ग्रीन सिग्नल दर्शविला होता असेही या नेत्याने म्हटले आहे.
पण पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत गेले आणि काय झाल माहित नाही पण ऐनवेळी विखे पाटील यांचे मुख्यमंत्री पद हुकले. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजप सत्तेत आले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न स्वप्नच राहिले.