Vinayak Mete : माझा विनायक मेटे करण्याची चर्चा! राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

Vinayak Mete : काही दिवसांपूर्वी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. अपघातानंतर त्यांना एक तास मदत न मिळाल्याने या अपघातावर संशय व्यक्त करण्यात आला होता. यामुळे याची बरीच चर्चा झाली. आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले, चर्चा अशीही सुरू आहे की अशोक चव्हाण यांचाही विनायक मेटे करा. यालाही मेटेसारखं करून टाक. हे जे कोणी करत आहेत, त्यांना एवढंच सांगायचं आहे की अशोक चव्हाणंचा जीव गेला तरी हरकत नाही. अशोक चव्हाण तुमच्यासारख डुप्लिकेट, खोट बोलून नेतृत्व करणाऱ्यांपैकी नाही, असे चव्हाण म्हणाले.

यामुळे याची सध्या चर्चा रंगली आहे. आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न आहे. पण, तुम्हाला जे काही करायचे ते करा ना. काय बोलायच आणि बोलायच नाही, ते तुमच्या बहिणीला सांगा ना. आम्हाला काय सांगता. आमच काहीही म्हणणं नाही.

मला हा उल्लेख करण्याची गरज नव्हती. पण माझ्यावर हा प्रसंग आणला गेला आहे, त्यामुळे मला बोलाव लागल, तसेच माझ्या नावे खोटं लेटरहेड तयार करून त्यातील मधला मजकूर काढून टाकलेला. खाली माझी सही ठेवलेली, असे अनेक प्रकार घडत आहेत.

मधल्या भागात मराठा समाजात संभ्रम निर्माण करायचा. अशोक चव्हाण मराठा समाजाच्या विरोधात आहे. हे दाखवून देण्यासाठी बोगस पत्र तयार केली जात आहेत. असा आरोप देखील त्यांनी केला आहे. याबाबत तक्रार दिली असल्याचे ते म्हणाले.

तसेच अशाच बनावट लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र देखील मिळाले आहे. याबाबत तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe