Vinod Tawde : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक बदल झाले आहेत. यामुळे कधी काय होईल हे कोणाला सांगता येत नाही. कधी कोणाचा पत्ता कट होईल आणि कधी कोणाची वर्णी लागेल, याबाबत काही सांगता येत नाही. आता केंद्रीय राजकारणातील भाजप नेते विनोद तावडे यांची कामगिरी पाहता ते पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय होतील.
तसेच विनोद तावडे हे देवेंद्र फडणवीसांना डावलून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील, अशी चर्चा सध्या सोशल मीडियात सुरू आहे. यामुळे आता काय होणार हे 2024 मध्येच समजेल. असे असताना याबाबत स्वतः विनोद तावडे यांनी स्पष्टपणे उत्तर दिले आहे.

विनोद तावडे म्हणाले, आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही रस नाही. आता ‘ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र’ असे उत्तर विनोद तावडे यांनी दिलं. यामुळे ते राज्यात पुन्हा येणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
केंद्रीय स्तरावर राजकारण करताना तुम्हाला खूप शिकायला मिळतं. तुमची दृष्टी एकदम व्यापक होते. त्यामुळे मला मनापासून केंद्रातच काम करायला आवडेल. राज्यात भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल.
सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांची एक टीम आहे. हेच लोक टीम म्हणून महाराष्ट्रात काम करतील, असेही विनोद तावडे यांनी सांगितले आहे. सगळे मिळून भाजपसाठी काम करत आहेत.