Ahmednagar News : गणेशला तुम्ही चांगली साथ दिली, आता कोणतीही निवडणूक या परिसरातील असू द्या, तुम्ही हाक द्या, आम्ही साथ देण्यासाठी सज्ज आहोत, असे प्रतिपादन गणेश कारखान्याचे मार्गदर्शक तथा कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या राहाता तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांचा सत्कार सोहळा विवेक कोल्हे व मान्यवरांच्या हस्ते नुकताच पार पडला.

कोल्हे म्हणाले, ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाचे केंद्र आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपले पाहिजे. पुणतांबा, वाकडी, चितळी या मोठ्या ग्रामपंचायती जिंकून जनतेचा कौल स्पष्ट झाला आहे.
जे सदस्य विजयी झाले, त्यांच्यासह जे कोणत्याही दबावाला बळी न पडता लढले, ही खरी ताकद आहे. सहकार हितासाठी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गणेश कारखाना निवडणूक लढलो आणि आता कारखाना सुरू झाला.
अनेक अडचणी त्यात आल्या; मात्र मार्ग निघाला. येत्या काळात पाणी प्रश्न भेडसावणार असून न्यायालयीन लढाई कोल्हे कारखाना लढतो आहे; मात्र न्याय मिळाला नाही तर आपल्याला रस्त्यावरची लढाईदेखील लढावी लागेल.
मतदान केले नाही म्हणून रस्ता अडवणे, डी. पी. अडवणे, विकासकामे रखडवणे ही पद्धत योग्य नाही. विरोध करून कोणी राजकरण केले तर आपणही अरे ला कारे करू शकतो आणि राजकारणाचे उत्तर राजकारणाने देऊ शकतो. नागरिकांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी कोल्हे कुटुंब तयार आहे, असे ते म्हणाले.
यावेळी धनंजय जाधव, बी. एल. आहेर यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले. गणेश कारखान्याचे उपाध्यक्ष विजय दंडवते, गंगाधर चौधरी, शिवाजीराव लहारे, अॅड. पंकज लोंढे, नितीन सदाफळ, धनंजय गाडेकर, राजेंद्र अग्रवाल, धनंजय जाधव, रामचंद्र बोठे, भाऊसाहेब चौधरी, सर्जेराव जाधव, अॅड. नाईक भाऊसाहेब, विक्रम वाघ, संजयराव शेळके, भाऊसाहेब थेटे, विजय फोफसे,
संजय सरोदे, डॉ. जेजुरकर, उत्तम मते, धनंजय गाडेकर, डॉ. वसंतराव लभडे, विलासराव टिळेकर, दादाभाऊ सांबारे, राजेंद्र बाभुळके, बाळासाहेब वाघ, राजेंद्र काळे, भानुदास कातोरे, रामभाऊ बोरबने, जी. बी. घोरपडे, दिलीपराव क्षीरसागर, वाल्मीकराव तुरकने, बबनराव काळे, सुभाषराव सांबारे, गणेशचे संचालक संपतराव चौधरी,
नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, बाबासाहेब डांगे, गंगाधर डांगे, संपतराव हिंगे, आलेश कापसे, विष्णुपंत शेळके, अरुंधती फोपसे, विजयराव फोपसे यांच्यासह राहाता तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.