विरोधकांच्या काळात तोट्यात असलेल्या संस्था आज आम्ही नफ्यात आणल्या : आमदार राजळे

Published on -

अहिल्यानगर : पाथर्डी मार्केट कमिटीमध्ये मागील वर्षी सत्ता बदल झाल्यानंतर विरोधकांनी तोट्यात नेऊन घातलेली संस्था पारदर्शक कारभारातून सत्ताधारी गटाने नफ्यात आणली. संस्थेचा वापर केवळ सत्तेसाठी करायचा नसतो तर शेतकऱ्यांची सर्वसामान्य जनतेला सेवा आणि सुविधा यातून मिळाली पाहिजे.

बाजार समिती असो खरेदी, विक्री संघ सभासदांसह शेतकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून या संस्थांचा पारदर्शक कारभार केला जात असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. तिसगाव उपबाजार समितीमध्ये नव्याने ५० मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन वजन काट्याचे उद्घाटन आमदार राजळे यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तूर करण्यात आले.

यावेळी आमदार राजळे म्हणाल्या, खरवंडी टाकळीमानुर तिसगाव पाठोपाठ आता मिरी येथे उपबाजार समिती सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. तिसगाव उपबाजार समिती शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून गाळ्यांचा वापर केवळ गोडाऊनसाठी न करता या ठिकाणी छोट्या-मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून मोठी बाजारपेठ उभा करण्याचे आवाहन आमदार राजळे यांनी केले.

पहिल्या वर्षी सत्तर लाखाचा नफा, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पारदर्शक कारभारामुळे संस्थेला पहिल्याच वर्षी ७० लाख रुपयांचा नफा मिळाला तसेच संस्थेने एक कोटी ७० लाखाची एफडी केली आहे. मात्र विरोधकांनी गोडाऊनसाठी टाकलेली लोखंडी जाळी देखील गिळून टाकली विरोधकांच्या स्वार्थीपणामुळे संस्था आर्थिक संकटात आली असल्याचा टोला सभापती सुभाष बर्डे यांनी विरोधकांना लगावला. या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी व बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe