Ahmednagar Politics : पालकत्व कसे निभवायचे आम्हाला कळते, काही गोष्टी आमच्याकडूनही शिका – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published on -

Ahmednagar Politics : जिल्ह्यातील जनतेला न्याय देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. अनेक वर्षे सता असूनही ज्यांना तालुक्याला पाणी देता आले नाही, त्यामुळे त्यांनी आम्हाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये, पालकत्व कसे निभावयाचे आम्हाला चांगले कळते. तुम्हीच आमच्याकडून काही शिका, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली.

शासन आपल्या दारी या अभियानात अकोले रस्त्यावरील शारदा लॉन्स मध्ये शासकीय योजनाच्या लाभाचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री विखे बोलत होते.

याप्रसंगी महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले, तालुक्यात कोणत्याही कामाला चिठ्ठीची गरज भासणार नाही. दलालांच्या ताब्यात गेलेला तालुका आता सामान्य लोकांच्या हातात द्यायचा असल्याने सरकार जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सरकारची सर्वांना न्याय देण्याची भूमिका आहे.

निळवंडे धरणातून कलव्याकरीता ३० सप्टेंबर रोजी पाणी सोडणार असल्याचे स्पष्ट करून डाव्या कालव्यांची काम प्रगतीपथावर आहेत. काही भागात ठेकेदारांनी काम जाणीवपूर्वक रखवडली असून त्यांच्याबाबत कठोर निर्णय घेणार असल्याचा इशारा विखे पाटील यांनी दिला.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रमांत आपण वेगवेगळ्या विभागाना २५ लाख विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. आज संगमनेर मधील ११०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ दिला आहे.

यावेळी पालकमंत्र्याच्या हस्ते लाभार्थ्यांना कृषी यांत्रिकीकरणात २३ टॅकर व नगरपालिकेला ४ घंटा गाड्याचे वाटप करण्यात आले. ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानातील अमृत कलक्ष यात्रा व्हॅनचे यावेळी पालकमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ५० पेक्षा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी प्रास्ताविक केले.

राज्यात ट्रिपल इंजिन सरकार काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहे. जनतेत जावून काम करणारे हे सरकार आहे. मागच्या सरकारच्या काळात कोणताही न्याय जनतेला मिळाला नाही. आता जनतेच्या मनातील सरकार असल्याने निर्णय तसे होत आहेत.- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe