Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यातील कानगोष्टीचा व्हीडीओ व्हायरल होताच तालुक्यात चर्चेला उधान आले असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्यात शिंदे फडणवीस सरकारला – अजितदादांच्या गटाने पाठिंबा दिल्यानंतर पहिले विधानसभेचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सरकारला धारेवर धरणासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आराखडे आखले जात आहेत.
माजी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे आपल्या राष्ट्रवादीच्या गटाच्या आमदारांबरोबर सोबत समन्वय राखून आहेत. असे असताना उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांच्या गटातील आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यातील त्या कानगोष्टीच्या व गुफ्तगूच्या व्हीडीओची चर्चा सध्या राहुरी तालुक्यामध्ये व मतदारसंघात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर नेमके अधिवेशन सुरू असतानाचा हा व्हीडीओ व्हायरल झाला आह. या कानगोष्टीचा अर्थ मात्र तनपुरे व फडणवीस यांचे समर्थक सध्या लावत आहेत. कालच विधानसभेत राहुरीच्या त्या पोलीस उपनिरीक्षकाच्या प्रकरणी लक्षवेधी उपस्थित करून गृहमंत्र्यांना यात तातडीने लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. यावर घटनेचे तात्पर्य लक्षात गृहमंत्री फडणवीस यांनी माहिती घेऊन बडतर्फीची कारवाई करण्याचे उत्तर दिले होते.