निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या संदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सांगून राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात दि.९ रोजी एक बैठक आयोजित केले असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यातील गुंड प्रवृत्ती व सत्ताधारी यांच्यातील अंतर आता कमी झाले आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथे राष्ट्रवादीच्या वतीने कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात ‘राष्ट्रवादी विजय निश्चय’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आला होता.
त्यानंतर नगर येथे राष्ट्रवादी भवन येथे नगर, राहुरी, शेवगाव, पारनेर, विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शानाखाली पार पडली. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, प्रदेश सचिव प्रताप ढाकणे, माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेनेचे संदेश कार्ले, बाबासाहेब भिटे, सुनिक अडसुरे, रामेश्वर निमसे, योगिता राजळे, मेहबूक शेख आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये याबद्दल सुद्धा बैठका झालेल्या आहेत. ९ तारखेला सुद्धा बैठक होणार आहे, असे ते म्हणाले. नगरच्या जागेच्या संदर्भामध्ये लवकरच आम्ही उमेदवार जाहीर करू व तो उमेदवार निश्चितपणे विजय होणारच असेल असाही दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला.
काही मित्र पक्षांनी जरी इतर जागेच्या संदर्भात मत व्यक्त केल असल तरी मात्र पूर्वी जे कोणी ज्या ज्या जागेवर निवडून आलेले आहेत, जरी ते पक्ष सोडून गेले असले तरी कार्यकर्ते मात्र तिथेच राहतात त्यामुळे या सर्व बाबींची चर्चा जागा वाटप करताना होणार आहे. व सर्व चर्चा करूनच जागा वाटपाचा निर्णय घेतला जाईल, असेही जयंत पाटील यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी तीन जागा दिल्या तर आपण महाविकास आघाडी मध्ये येऊ, असे सांगितले. वास्तविक पाहता त्यांना एक जागा दिली जाईल. पण ते इतर जागा ची मागणी करत आहे, त्या संदर्भामध्ये त्यांना महाविकास आघाडीमध्ये इतरांसाठी त्या जागा आहेत.
त्यामुळे आम्ही त्यामध्ये बदल करू शकत नाही, आमचा जानकरांचा जिव्हाळा हा चांगला आहे, पण त्यांचा जो विचार आहे, तो आम्ही पक्ष म्हणून मान्य करू शकत नाही, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना जयंत पाटील यांनी तर्क वितर्क कोणी काही सांगू मात्र तसेच नाही . मी काही शरद पवारांच्या फॅमिलीचा नाही, मात्र मी प्रदेशाध्यक्ष आहे. अशीच परिस्थिती अगोदर नगरचे पाचपुते, आर. आर. पाटील, मधुकर पिचड हे सुद्धा काही शरद पवारांच्या फॅमिलीतले नव्हते असे म्हणत यालाच उत्तर दिले.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयी विचारल्यानंतर राज्य सरकारने त्यांना काय आश्वासन दिले हे आपल्याला आज माहीत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. या वेळी राष्ट्रवादी भवन येथे नगर, राहुरी, शेवगाव, पारनेर, विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र बहुजनांच्या ताब्यात ठेवायचा असेल तर त्यासाठी लढावे लागेल, असे प्रताप ढाकणे यांनी म्हटले.
यावेळी राहुरी तालुक्यातील सुनिल अडसूरे म्हणाले, शरद पवार यांना चोर कळले होते. त्यामुळे राहिले ते मावळे आनि उडाले ते कावळे, असे म्हणत पक्ष कोणता असो, वा चिन्ह आम्ही शरद पवार यांच्या सोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले