औरंगजेबाच्या कबरीचं काय करायचं ? पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं…

Published on -

अहिल्यानगर (१७ मार्च २०२५): औरंगजेबाने हिंदू मंदिरांची तोडफोड करून हिंदू संस्कृतीला संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना त्रास दिला. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीच्या अस्तित्वावर पुनर्विचार करणे गरजेचे आहे, अशी भूमिका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली.

विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेला समर्थन

छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेने पुन्हा कारसेवेचा इशारा दिला आहे. या विषयावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, “जनभावनांचा आदर केला पाहिजे. औरंगजेबाने हिंदू देवतांच्या मूर्ती आणि मंदिरांची नासधूस केली. त्यामुळे त्याची कबर तिथे असणे योग्य नाही. हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केलेल्या भावनेशी मी सहमत आहे.”

इतिहासाचा आदर आणि आणि जनभावनांचे महत्त्व

“काही लोक म्हणतात की इतिहास जाणून घेण्यासाठी औरंगजेबाची कबर असणे आवश्यक आहे. पण त्यांनी इतिहास वाचला आहे का? जर त्यांनी खरा इतिहास वाचला असता, तर औरंगजेबाच्या अत्याचारांची त्यांना जाणीव झाली असती. त्यामुळे केवळ इतिहासासाठी ही कबर जतन करण्याची गरज नाही,” असे पालकमंत्री म्हणाले.

उमेद मॉलची संकल्पना

महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी आधुनिक आणि राज्याला दिशादर्शक ठरेल असा उमेद मॉल जिल्हास्तरावर उभारण्याची घोषणा विखे पाटील यांनी केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने हा मॉल उभारण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात अशा मॉल्सची स्थापना करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe