Maharashtra Politics : राज्यात आगामी महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार का? या प्रश्नाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने महायुतीच्या मदतीने १३२ जागांवर विजय मिळवला होता. हा विजय भाजपासाठी ऐतिहासिक ठरला असला, तरी महापालिका निवडणुकीत पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजपाच्या अनेक नेत्यांकडून होत आहे.
स्वबळाचा आग्रह
अलीकडेच झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी महायुती नको, तर स्वबळावर निवडणूक लढवावी, असे मत मांडले. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही संमती असल्याचे बोलले जात आहे.

पुणे दौऱ्यात महत्त्वाची चर्चा ?
२२ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी फडणवीस आणि शाह यांच्यात महापालिका निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या स्वबळाच्या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदेंची महायुतीबाबत भूमिका महायुतीतील तीन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी, अन्यथा सर्व पक्षांचे नुकसान होऊ शकते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
फडणवीस-शिंदे यांच्यात संघर्ष ?
महायुती सरकारच्या स्थापनेपासून एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सरकार स्थापनेच्या वेळी शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावर नाराजी दर्शवली होती,भाजपने सर्वाधिक जागा जिंकूनही मुख्यमंत्रिपद शिंदेंना दिले. उपमुख्यमंत्रिपद घेण्याबाबतही शिंदेंनी शेवटपर्यंत निर्णय घेतला नव्हता. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये छुपा संघर्ष असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.