मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर आरोपांचा सपाटा लावणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी सरकार बदलल्यानंतर काय भूमिका घेतली आहे. याकडे सर्वांचे लक्ष होते.
शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. सरकार बदललं असलं तरीही मी माझ्या तक्रारी मागे घेणार नाही. मंत्री असले तरीही अनिल परब यांचे बेकायदेशीर बांधकाम पाडलं जाणारच, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
महाराष्ट्राला माफिया मुक्त करण्याचा गेल्या अडीच वर्षे आमचा संषर्ष होता. एकनाथ शिंदे यांच्या रुपाने तो पूर्ण झाला आहे. याबद्दल मी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. एकनाथांना मुख्यमंत्र्याच्या चेंबरमध्ये पाहून मला आनंद झाला. पण अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टविरोधातील पुढील करावाई सुरु ठेवावी, अशी विनंती यावेळी मी त्यांना केली, असे किरीट सोमय्यांनी सांगितले आहे.