राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही – सुजित झावरे पाटील

Published on -

Maharashtra News : राजकारणात सत्ता येते सत्ता जाते. आजकाल राजकारण अत्यंत वेगाने बदलत चाललेले आहे. अनिश्चितता वाढत चालली आहे. कधी काय होईल ते सांगता येत नाही.

गेली ४० वर्षे झावरे परिवार सामाजिक बांधिलकीतून काम करत आहे. हीच बांधिलकी कायम ठेवून आपण काम करत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले.

तिखोल (ता. पारनेर) येथील गणपती मंदिरासमोरील सभामंडप भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. झावरे यांच्या प्रयत्नातून हा सभामंडप मंजूर झाला.

यावेळी पारनेर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अॅड. रघुनाथ खिलारी, बाजार समितीचे माजी सभापती अरुण ठाणगे, राघू ठाणगे, नागचंद ठाणगे, सोनू मंचरे, चांद इनामदार, मगबूल इनामदार,

सुभाष कावरे, शिवाजी ठाणगे, संदीप ठाणगे, माजी सरपंच अनिल तांबडे, विठ्ठल ठाणगे, प्रकाश साळवे, अशोक ठाणगे, ठका ठाणगे, मिठू इनामदार आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe