मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून गप्प असलेले शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी अधिवेशन सुरु होताच शिवसेनेतील नेत्यांबाबतची खदखद व्यक्त केली. मात्र गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना सभागृह चांगलेच गाजवले.
आम्ही सत्ता सोडून पळालो तरी आमचं मन कसं कळालं नाही. तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं, आमचा बंड नाहीए, हिंदुत्वाशी फारकत घेऊ नये म्हणून आम्ही उठाव केला आहे, असे म्हणत गुलाबराव पाटलांनी सभागृह दणाणून सोडल्याचे पहायला मिळाले.
बाळासाहेबांनी टपरीवाल्यांना, रिक्षावाल्यांना आमदार केले, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन आम्ही शिवसेना सोडली. जनतेचे काम करण्यासाठी सत्ता हवी असे बाळासाहेब सांगायचे, मात्र आमच्यावर टीका केली गेली. आम्ही बंड नाही, उठाव केला आहे. सत्तेचे केंद्रीकरण बाळासाहेबांनी केले आहे, हिंदुत्वाचा रक्षण करणार पक्ष म्हणजे शिवसेना, जे मिळालं ते बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.