मुंबईतील ‘या’ भागात फक्त 20 लाखात घर, म्हाडाचा मुंबईजवळचा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी ठरणार फायदेशीर

Published on -

Mhada News : मुंबईत घर घेणे हे आपल्यापैकी अनेकांचे स्वप्न असेल. मात्र मुंबईत घर घेणे काही सोपी बाब नाही. मुंबईतील घरांच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शहरात घरांच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की, मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी राजधानीत आपले स्वतःचे घर खरेदी करणे एक आव्हान बनले आहे.

अनेकजण होम लोन घेऊन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करतात पण त्यांच्या किमती पाहता काही लोक आयुष्यभर लोन फेडत बसता. यामुळे अनेकांच्या माध्यमातून म्हाडाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहिली जाते. दरम्यान जर तुम्हीही मानाच्या घरांच्या आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता अंबरनाथमध्ये तुम्हाला फक्त 20 लाखांमध्ये घर मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

म्हाडा सुरु करतोय नवा प्रोजेक्ट

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने म्हणजेच महाराणी अंबरनाथमध्ये नवीन प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शिवगंगा नगर आणि कोहोज कुंठवली येथील घरांचा समावेश आहे. यामुळे, मुंबईच्या जवळ असलेल्या या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात घर मिळवण्याची संधी मिळणार आहे.

या प्रकल्पात मुख्यतः मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे बांधली जात आहेत. यात एकूण 2531 घरे तयार होणार आहेत. शिवगंगा नगर येथे 925 फ्लॅट्स बांधले जाणार आहेत, ज्यात 151 फ्लॅट्स अत्यल्प गटासाठी आणि 774 फ्लॅट्स मध्यम उत्पन्न गटासाठी असतील. कोहोज कुंठवली येथे 1606 घरे बांधली जातील, जी सर्व अत्यल्प गटासाठी असतील.

यातील अत्यल्प उत्पन्न गटासाठीच्या घरांची किंमत 20 ते 22 लाख रुपये असणार आहे, ज्यामध्ये 320 चौरस फूट क्षेत्रफळ असलेली घरे उपलब्ध होतील. मध्यम उत्पन्न गटासाठी घरांची किंमत 45 ते 50 लाख रुपये असणार आहे, आणि यांचे क्षेत्रफळ 650 ते 725 चौरस फूट असेल. या प्रकल्पाचे बांधकाम लवकरच सुरु होईल आणि मार्च 2028 पर्यंत ते पूर्ण होईल.

त्यामुळे, तुम्हाला स्वस्तात घर मिळवण्याची ही एक उत्तम संधी राहणार आहे. नक्कीच ज्या लोकांना कमी किमतीत मुंबई नजीक घर हवे असेल त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी राहणार आहे. पण म्हाडाचा हा नवा प्रकल्प नेमका कधीपर्यंत पूर्ण होणार हे पाहणे देखील तेवढेच उत्सुकतेचे राहील.

मुंबईजवळ घर घेण्याचे स्वप्न असणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई जवळ एक नवीन प्रकल्प विकसित केला जाणार आहे. यामुळे मुंबईजवळ घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News