तुमच्या स्वतःच्या बँक अकाउंटमधून पैसे काढलेत तरी टॅक्स भरावा लागतो, इनकम टॅक्स विभागाचा ‘हा’ नियम माहितचं असायला हवा

बँकेतून पैसे काढण्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. बचत खात्यात रोख रक्कम जमा करण्यासाठी तसेच रक्कम काढण्यासाठी काही नियम बनवण्यात आले आहेत हे तुम्हाला माहीतचं असायला हवेत. कारण की या नियमांचे उल्लंघन झाल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.

Published on -

Income Tax Rule : बँक अकाउंट असणाऱ्या ग्राहकांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरेतर अलीकडे बँकिंग व्यवहार वाढले आहेत. पैशांचे व्यवहार बँकेमुळे सुलभ झाले आहेत. अलीकडे रोकड व्यवहारांऐवजी यूपीआयच्या मदतीने पैशांची देवाणघेवाण केली जात आहे. मात्र अनेक जण आजही पैशांच्या व्यवहारासाठी कॅशचा वापर करतात. कॅशने व्यवहार करण्यासाठी बँक अकाउंट मधून पैसे काढले जातात.

पण, बँकेतून पैसे काढण्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. बचत खात्यात रोख रक्कम जमा करण्यासाठी तसेच रक्कम काढण्यासाठी काही नियम बनवण्यात आले आहेत हे तुम्हाला माहीतचं असायला हवेत. कारण की या नियमांचे उल्लंघन झाल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.

सेविंग अकाउंटमध्ये रक्कम जमा करणे आणि काढण्याचे नियम कसे आहेत?

तुमचेही कोणत्या ना कोणत्या बँकेत अकाउंट असेल. कोणाचे प्रायव्हेट बँकेत आणि कोणाचे खाजगी बँकेत अकाउंट असेल. खरे तर बँक अकाउंट चे वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांचे बचत खाते असते. सेविंग अकाउंट म्हणजेच बचत खाते हे आपले वाचवलेले पैसे ठेवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

यामुळे आपण सर्वजण आपण कमावलेला पैसा बचत खात्यात जमा करत असतो. तसेच जेव्हा पैशांची गरज भासते तेव्हा आपण यामधून पैसे काढत असतो. पण, एका विशिष्ट कालावधीत तुम्ही बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करू शकता याची एक मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे. ही मर्यादा मनी लाँड्रिंग, कर चुकवेगिरी आणि इतर बेकायदेशीर आर्थिक क्रियाकलपांना रोखण्यासाठी, रोख व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

आता आपण ह्याच नियमांची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आयकर विभागाने तयार केलेल्या नियमानुसार, जर तुम्ही एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा केली तर तुम्हाला त्याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. मात्र ही मर्यादा सेविंग बँक अकाउंट साठी आहे.

जर तुमचे करंट बँक अकाउंट असेल म्हणजेच चालू खाते असेल तर ही मर्यादा 50 लाख रुपये आहे. जर यां ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार झाले तर बँक या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला सोपवते. मग आयकर विभागाच्या माध्यमातून या सदर बँक खातेधारकांची कसून चौकशी केली जाते.

या चौकशी दरम्यान जर काही गैरव्यवहार आढळून आला तर संबंधितांवर कारवाई होत असते. काही प्रकरणात दंडात्मक कारवाई केली जाते. ज्याप्रमाणे पैसे जमा करण्यासाठी नियम आहेत त्याचप्रमाणे पैसे काढण्यासाठी सुद्धा नियम आहेत. ते असे की, तुम्ही एका आर्थिक वर्षात तुमच्या बचत खात्यातून 1 कोटींहून अधिक रक्कम काढल्यास त्यावर 2% TDS (टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स) कापला जाईल.

म्हणजेच तुमच्या स्वतःच्या बँक अकाउंटमधन पैसे काढण्यासाठी देखील तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे जे आयकर भरत नाहीत, म्हणजे ज्यांनी गेल्या तीन वर्षांपासून आयटीआर (आयकर रिटर्न) भरलेला नाही त्यांच्यासाठी ही मर्यादा वीस लाख रुपये आहे. म्हणजे या अशा लोकांनी जर एका आर्थिक वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे काढलेत तर त्यांच्याकडून 2% टीडीएस वसूल केला जातो.

तसेच आयकर भरत नसतानाही एका आर्थिक वर्षात 1 कोटी रुपये काढल्यास त्यांच्याकडून 5% TDS वसूल केला जातो. कलम 194N अंतर्गत कापलेला टीडीएस उत्पन्न म्हणून वर्गीकृत केला जात नाही, परंतु तुम्ही आयटीआर भरताना ते क्रेडिट म्हणून वापरू शकता.

आयकर कायद्याच्या कलम 269ST अंतर्गत, एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख जमा केली तर त्याला दंड द्यावा लागतो. मात्र, बँकेतून पैसे काढण्यासाठी हा दंड लागू होणार नाही. परंतु, ठराविक मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यावर टीडीएस कापला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe