MHADA Housing Lottery : स्वतःच घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडा १३ हजार पेक्षा जास्त घरांची विक्री करणार

Updated on -

स्वतःच घर असावं असं प्रत्येक माणसाचं स्वप्न असत. स्वतःच घर घेण्यासाठी अनेकजण दिवसरात्र कष्ट करत असतात. मात्र सध्या वाढलेल्या घरांच्या किमतीमुळे अनेकांना घर घेणं शक्य होत नाही. मात्र आता घर खरेदी करू इच्छित असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडा १३ हजार पेक्षा जास्त घरांची विक्री करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने घराच्या प्रतीक्षेत असलेल्या सामान्य माणसांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. मुंबई महानगर प्रदेशात उपलब्ध असलेली तब्बल १३,३९५ न विकलेली घरं आता ‘बुक माय होम’ या नव्या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून विक्रीसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे आता घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

घरबसल्या पाहा घरांची माहिती

‘बुक माय होम’ या पोर्टलमुळे आता तुम्ही घरी बसूनच म्हाडाच्या घरांची माहिती पाहू शकता, घर निवडू शकता आणि थेट बुकिंगही करू शकता. ही संपूर्ण प्रक्रिया प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर आधारित आहे, त्यामुळे जो जास्त लवकर अर्ज करेल आणि घर निवडेल, त्याला ते घर मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर घर घेण्याचा विचार करत असाल तर लवकरात लवकर अर्ज करा.

म्हाडाची घरे ही विरार बोळींज, खोणी, शिरढोण, गोठेघर, भंडार्ली या ठिकाणी असून, याआधी ही घरे विक्रीसाठी होती मात्र पूर्णपणे विकली गेली नव्हती. आता त्यांची पुन्हा विक्री करण्यात येणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करण्यापासून ते घर निवडण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि यामध्ये कोणताही मॅन्युअल हस्तक्षेप नाही. त्यामुळे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सर्व गोष्टी समजणार आहेत.

अर्ज करताना उमेदवारांनी त्यांच्या नावासह आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक स्वघोषणापत्र पोर्टलवर अपलोड करावे. ही कागदपत्रं सबमिट केल्यानंतर ती डिजिटल पद्धतीने पडताळली जातात. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराचे वैयक्तिक प्रोफाइल तयार होते आणि त्याला फ्लॅट्सची यादी पाहण्याची सुविधा मिळते. या यादीमध्ये प्रत्येक घराचा क्रमांक, मजला, क्षेत्रफळ, किंमत आणि घर कुठल्या प्रकल्पात आहे याची माहिती स्पष्टपणे दिलेली असते. त्यामुळे कोणतं घर घ्यावं हे ठरवणं सोपं होतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News