Mhada News : तुम्ही नवीन घर खरेदीच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडा प्राधिकरणाकडून तुम्हाला स्वस्तात मस्त घर उपलब्ध होणार आहे.
खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईसारख्या शहरांमध्ये घरांच्या किमती प्रचंड वाढले आहेत आणि यामुळे सर्वसामान्यांना घर खरेदी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

अगदी तारेवरची कसरत करून सर्वसामान्य घर खरेदी करण्याच्या तयारी करतात पण त्यांना मनपसंत लोकेशन मिळत नाही. मात्र आता म्हाडा प्राधिकरणाने अगदीच रेल्वे स्टेशन जवळ सर्वसामान्यांना 15 लाख रुपयांच्या किमतीत घर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
त्यामुळे जर तुम्हालाही नजीकच्या भविष्यात मुंबईत ते पण स्टेशन जवळ घर घ्यायचं असेल तर प्राधिकरणाची ही योजना तुमच्या कामाची ठरणार असून या योजनेचा तुम्ही शंभर टक्के लाभ घ्यायला हवा.
दरम्यान आता आपण म्हाडाचा हा नवा प्रकल्प नेमका कुठे सुरू आहे आणि या प्रकल्पातील घरांची किंमत कशी आहे याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
इथं मिळणार 15 लाखात घर
मुंबई नजीक तुम्हाला घर खरेदी करायच असेल तर म्हाडाचा नवीन प्रोजेक्ट तुमच्या फायद्याचा राहील. कल्याण-डोंबिवली परिसरात अगदी रेल्वे स्टेशनच्या शेजारी म्हाडाचा नवीन गृहप्रकल्प विकसित होत आहे. महत्वाची बाब म्हणजे या प्रोजेक्टमध्ये विकसित होणारी घरे वन बीएचके आणि टू बीएचके आहेत.
सर्वसामान्यांना आपल्या सोयीनुसार येथे घर मिळतील. उत्तम लोकेशन, परवडणारी किंमत आणि तात्काळ ताबा हेच या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. येथे केवळ 15 लाख रुपयांपासून 1 आणि 2 BHK घरे मिळणार आहेत.
उत्तम लोकेशन, परवडणारी किंमत आणि तत्काळ ताबा – या त्रिसूत्रीचा समावेश असलेली ही योजना अनेकांना आपले घराचे स्वप्न साकार करण्याची संधी देणार आहे. कल्याण डोंबिवली जवळ शिरढोण येथील हा प्रकल्प असून या प्रकल्पातील घरांची सुरुवातीची किंमत 15 लाख रुपये आहे.
साहजिकच टू बीएचके घरांची किंमत अधिक राहणार आहे. मात्र इथे सर्वसामान्यांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
घर खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिये बाबतची सविस्तर माहिती येत्या काही दिवसांनी प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात येणार आहे.