Property खरेदी करतायेत! ‘ही’ पाच कागदपत्र पाहण्याशिवाय एक पाऊल देखील नका टाकू पुढे.. नाहीतर नुकसान अटळ

मालमत्ता खरेदी करताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. लोक सहसा मालमत्तेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.परंतु खरेदी करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची योग्य पडताळणी करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे भविष्यात कोणत्याही अडचणी किंवा कायदेशीर गुंतागुंतीला सामोरे जावे लागू नये.

Published on -

Property Buying Tips:- मालमत्ता खरेदी करताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. लोक सहसा मालमत्तेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.परंतु खरेदी करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची योग्य पडताळणी करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे भविष्यात कोणत्याही अडचणी किंवा कायदेशीर गुंतागुंतीला सामोरे जावे लागू नये. नवीन किंवा जुनी मालमत्ता खरेदी करताना काही महत्त्वाच्या दस्तऐवजांची तपासणी करणे गरजेचे आहे.जेणेकरून व्यवहार सुरक्षित आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य राहील.

घर किंवा फ्लॅट घेताना काय काळजी घ्याल?

प्रथम ज्या प्रकल्पात तुम्ही घर किंवा फ्लॅट खरेदी करत आहात तो RERA (Real Estate Regulatory Authority) मध्ये नोंदणीकृत आहे का? हे तपासणे आवश्यक आहे. यामुळे मालमत्तेच्या कायदेशीर स्थितीबाबत खात्री करता येते. त्यानंतर विक्रेत्याच्या मालकी हक्काची पडताळणी करणे महत्त्वाचे आहे.

विक्रेता हा खरोखरच मालमत्तेचा कायदेशीर मालक आहे का किंवा त्या मालमत्तेवर अन्य कोणाचा हक्क आहे का? हे पाहण्यासाठी संपूर्ण व्यवहाराच्या इतिहासाची (Chain of Documents) चौकशी करणे आवश्यक असते. या दस्तऐवजात मालमत्ता कोणाकडून कोणाकडे हस्तांतरित झाली आहे याचा स्पष्ट उल्लेख असतो.

प्रॉपर्टीवरील कर्ज बोजा पाहणे

मालमत्तेवर कोणतेही गृहकर्ज किंवा बँक कर्ज आहे का? हे जाणून घेण्यासाठी “भार प्रमाणपत्र” तपासावे लागते. हे प्रमाणपत्र संबंधित मालमत्तेवर कोणतेही आर्थिक बोजा आहे की नाही याची माहिती देते.

तसेच कोणतेही थकबाकी, दंड आहे का, हेही यातून स्पष्ट होते. ही माहिती रजिस्ट्रार कार्यालयातून फॉर्म क्रमांक २२ भरून मिळवता येते. त्याचप्रमाणे, “भोगवटा प्रमाणपत्र” देखील महत्त्वाचे असून हे दस्तऐवज संबंधित बिल्डरकडून घ्यावे लागते. जर बिल्डर हे प्रमाणपत्र देत नसेल, तर खरेदीदार कायदेशीर कारवाई करू शकतो.

बिल्डरकडून ताबा पत्र घेणे

मालमत्तेचा ताबा घेताना, विकसकाकडून “ताबा पत्र” दिले जाते. या पत्रात मालमत्तेच्या ताब्याची तारीख असते. जी गृहकर्ज मिळविण्यासाठी आवश्यक असते. तथापि मालमत्तेचा पूर्ण ताबा घेण्यासाठी “ऑक्युपन्सी सर्टिफिकेट” (OC) मिळणे गरजेचे असते. तसेच मालमत्ता खरेदी करताना गहाणखताची चौकशी करणे गरजेचे आहे. कारण जर मालमत्ता आधीच बँकेकडे गहाण ठेवलेली असेल तर भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.

मालमत्तेवरील कराची स्थिती पाहणे

शेवटी विक्रेत्याने मालमत्तेवरील कर भरला आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे. मालमत्ता कर थकित असल्यास त्याचा परिणाम मालमत्तेच्या बाजारभावावर होतो आणि भविष्यात कायदेशीर समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच खरेदीदाराने स्थानिक महानगरपालिका कार्यालयात जाऊन मालमत्तेच्या करासंबंधी संपूर्ण माहिती घ्यावी.

एकूणच मालमत्ता खरेदी करताना सर्व संबंधित दस्तऐवज तपासणे आणि आवश्यक ते कायदेशीर सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे कोणत्याही फसवणुकीपासून संरक्षण मिळते आणि तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News