Ajab Gajab News : जगातील प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत व्हायचे आहे, मात्र श्रीमंत होणे सोपे नाही. त्यासाठी एक तर मोठा व्यवसाय करावा लागेल किंवा एखादी लॉटरी तरी लागली पाहिजे.
व्यवसाय मोठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत करावी लागते, मात्र लॉटरी नशिबाचा खेळ आहे आणि नशीब कधीही उघडू शकते.
इंग्लंडमधील एका व्यक्तीचे नशीब असेच चमकले आणि तो एका रात्रीत कोट्यधीश झाला. त्याला लॉटरी लागली. एक-दोन लाखांची नाही तर तब्बल १०० कोटी रुपयांची. मात्र पैसा मिळणे मोठी बाब आहे, पण त्याहीपेक्षा मोठी बाब म्हणजे तो सांभाळणे आहे. काही वर्षांत हा कोट्यधीश रोडपती झाला.
मिकी कॅरल इंग्लंडच्या नॉरफॉकमध्ये राहत असताना त्याला २००२ मध्ये तब्बल १०० कोटींची लॉटरी लागली होती. त्यावेळी त्याचे वय केवळ १९ वर्षे होते. लॉटरी जिंकल्यानंतर पैशाच्या नशेत तो गुरफटून गेला. त्याने ड्रग्ज घेणे, इतर देशात जाऊन पाट्या करणे, महागड्या गाड्या, दागिने आणि कपडे खरेदी केले.
एवढेच नाही तर त्याने पत्नीलाही धोका दिला आणि वाईट कामात व्यस्त झाला. सध्या त्याची परस्थिती दयनीय झाली असून त्याच्याकडे बहिणीचा अंत्यसंस्कार करण्यासाठीदेखील पैसे नाहीत. तेही दुसऱ्याकडे मागण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. त्याच्या बहिणीचा मृत्यूही मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेतल्याने झाला आहे.
त्यानंतर मुलीचे मित्र आणि नातेवाईकांना पैसे गोळा करून तिचा अंत्यसंस्कार केला. मिकीला घडलेल्या प्रकाराबद्दल कुठलाही पश्चाताप नाही. तो म्हणतो, पैसे असतानाची १० वर्षे जीवनातील सर्वात चांगले दिवस होते.
२०१३ मध्येच तो पुरता कंगाल झाला आणि बेरोजगारही. तीन महिने तो बेघर असणाऱ्यांसाठी बनवलेल्या हॉटेलमध्ये राहिला. ३९ वर्षांचा मिकी २०१९ मध्ये स्कॉटलँडला राहण्यासाठी गेला आणि तेव्हापासून तो कोळसा डिलिव्हरीचे काम करतो. त्यानंतर तो आपल्या पहिल्या पत्नीसोबत राहत आहे.