अखेरकार विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ! दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे फायनल वेळापत्रक जाहीर, कसे राहणार वेळापत्रक ? वाचा…

यंदाही या 9 विभागीय शिक्षण मंडळा अंतर्गत दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा संपन्न होणार आहे. दरवर्षी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात येते.

Published on -

10th And 12th Board Exam Timetable : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून दहावी आणि बारावी बोर्डाच्या वेळापत्रकाबाबत चर्चा सुरू आहेत. आता मात्र या बोर्ड परीक्षेचे फायनल वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे.

त्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यासाला सुरुवात करावी लागणार आहे. आज गुरुवारी महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावी आणि बारावी बोर्डाचे फायनल वेळापत्रक जाहीर केले. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी या वेळापत्रका संदर्भात माहिती दिली आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची बोर्ड परीक्षा घेण्यात येते.

यंदाही या 9 विभागीय शिक्षण मंडळा अंतर्गत दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा संपन्न होणार आहे. दरवर्षी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात येते.

यानुसार यंदाही दहावी आणि बारावी बोर्डाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. तसेच वेळापत्रका संदर्भात काही हरकती सूचना असतील तर त्या 23 ऑगस्टपर्यंत मंडळाकडून मागवन्यात आल्या होत्या.

दरम्यान या प्राप्त सूचनांवर विचार करून राज्य मंडळाकडून संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आल्याचे आता दिसून येत आहे. अशा परिस्थितीत आता आपण दहावी आणि बारावी बोर्डाचे फायनल वेळापत्रक कसे आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

दहावी आणि बारावी बोर्डाचे फायनल वेळापत्रक!

खरे तर यंदा नेहमीप्रमाणे दहा दिवस आधीच दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 या काळात घेतल्या जाणार आहेत.

तसेच बारावी बोर्डाची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या काळात घेतली जाणार आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत बोलायचं झालं तर दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा ही 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2025 या काळात पूर्ण होणार आहे. तसेच दहावी बोर्डाची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 या काळात घेतली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News