10th And 12th Exam Fee : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहेत. जर तुम्हीही यंदा दहावी किंवा बारावीच्या वर्गात प्रवेश घेतला असेल किंवा तुमचे पाल्य यंदा या वर्गात दाखल झाले असतील त तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे.
खरे तर करिअरच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही वर्ष खूपच महत्त्वाचे ठरतात. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांचे करिअर घडवत असतात. यामुळे या परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी जोरदार मेहनत घेत असतात.
पालकही या काळात विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष ठेवून असतात आणि आपल्या पाल्याने चांगल्या गुणांनी बोर्डाची परीक्षा पास व्हावी अशी त्यांची इच्छा असते. मात्र यंदा दहावी आणि बारावीच्या वर्गात जे विद्यार्थी आहेत त्यांना बोर्डाच्या परीक्षा फी साठी अधिकची रक्कम मोजावी लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा फी तब्बल 12 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
कागदाच्या किमती वाढल्या असल्याने परीक्षा फी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली असून आता आपण या दोन्ही वर्गाच्या बोर्ड परीक्षेसाठी परीक्षा फी किती भरावी लागणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
विद्यार्थ्यांना किती फी भरावी लागणार?
शिक्षण मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दहावी बोर्ड परीक्षेसाठी आधी परीक्षा फी म्हणून 420 रुपये आकारले जात असत. मात्र यंदापासून या विद्यार्थ्यांना 470 रुपये एवढी परीक्षा फी भरावी लागणार आहे. म्हणजेच दहावी बोर्डाची परीक्षा फी 50 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे बारावी बोर्डाची परीक्षा फी देखील 50 रुपयांनीच वाढली आहे.
आधी बारावी बोर्डासाठी परीक्षा फी म्हणून 440 रुपये वसूल केले जात असत मात्र आता ही फी 490 रुपये एवढी करण्यात आली आहे. विशेष बाब अशी की फक्त परीक्षा फीच वाढवण्यात आली आहे असे नाही तर इतरही अन्य शुल्क या वर्षापासून वाढवले गेले आहेत.
प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका शुल्क, प्रमाणपत्र शुल्क आणि प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क वाढवण्याचा निर्णय देखील मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. यामुळे नक्कीच सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.