10th And 12th HSC Science : यावर्षी दहावीला आणि बारावीला ज्यांनी प्रवेश घेतला आहे अशा महाराष्ट्र बोर्डाच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात. खरेतर 10वी अन 12वी बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी खूपच महत्त्वाच्या असतात.
यामुळे या परीक्षांसाठी विद्यार्थी खूपच मेहनत घेतात. विद्यार्थ्यांसमवेतच त्यांचे पालक देखील या परीक्षांसाठी खूपचं मेहनत घेतात. पालक त्यांना जेवढे शक्य आहे तेवढ्या सर्व सोयीसुविधा आपल्या पाल्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात.
यामुळे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेकडे विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या पालकांचे देखील लक्ष असते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जारी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हे वेळापत्रक जाहीर केले असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळाच्या माध्यमातून दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
विशेष बाब अशी की यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा नेहमीपेक्षा आठ ते दहा दिवस आधीच घेतल्या जाणार असल्याची माहिती बोर्डाकडून समोर आली आहे. यामुळे आज बोर्डाकडून जाहीर झालेले हे वेळापत्रक विद्यार्थ्यांनी आत्ताच नोट डाऊन करून घेणे आवश्यक आहे.
तसेच आगामी बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून आत्तापासूनच कसून अभ्यासाला सुरुवात करणे जरुरीचे आहे. आता आपण महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेले दहावी आणि बारावी परीक्षेचे हे वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कधी होणार दहावीची परीक्षा
दरवर्षीपेक्षा यंदा दहावीची परीक्षा आठ ते दहा दिवस लवकर होणार आहे. दहावी बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होईल 17 मार्च 2025 पर्यंत ही परीक्षा राहणार आहे.
तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार, २० फेब्रुवारी २०२५ या काळात घेतली जाणार आहे.
कधी होणार बारावीची परीक्षा
बारावीची परीक्षा देखील आठ-दहा दिवस लवकरच होणार आहे. यंदा बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 ला सुरू होईल आणि 18 मार्च 2025 पर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार, १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे.