दहावी आणि बारावीच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर ! 12 वी चा निकाल 13 मे रोजी आणि 10वी चा निकाल ‘या’ दिवशी लागणार

सध्या दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा दिलेले विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. लाखो विद्यार्थी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नेमका कधी लागणार? याकडे लक्ष ठेवून आहेत. दरम्यान दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची संभाव्य तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

Published on -

10th And 12th Result : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या संदर्भात. खरंतर महाराष्ट्र राज्य बोर्डाने यंदा पहिल्यांदाच दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळेच्या आधी घेतल्यात.

चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दरवर्षीपेक्षा 10 दिवस अगोदर सुरु झाली अन वेळेच्या आधीच या परीक्षा संपन्न झाल्यात. 11 फेब्रुवारी 2025 ते 11 मार्च 2025  या काळात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपन्न झाली.

दहावी बोर्ड परीक्षा बाबत बोलायचं झालं तर ही परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरू झाली आणि 17 मार्च 2025 रोजी संपन्न झाली. महत्त्वाची बाब अशी की बोर्ड परीक्षा झाल्यानंतर ठरवून दिलेल्या वेळेतच शिक्षकांनी उत्तर पत्रिकांची सुद्धा तपासणी पूर्ण केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे तपासलेल्या उत्तर पत्रिकांची सध्या युद्ध पातळीवर पडताळणी पूर्ण केली जात असून निकालाची छपाई देखील सुरू करण्यात आली असल्याची खात्रीलायक बातमी सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. यावरून आता लवकरच निकाल जाहीर होणार असल्याचे दिसत आहे.

महत्वाची बाब अशी की बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दहावी आणि बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी यावर्षी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 15 मे 2025 च्या आधीच जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती.

यानुसार यंदा दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा चा निकाल 15 मे च्या आधीच लागणार असल्याचे बोलले जात आहे. बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल यावर्षी 13 मे 2025 रोजी जाहीर केला जाणार आहे. दुसरीकडे दहावी बोर्ड परीक्षेचा निकालाबाबत बोलायचं झालं तर या परीक्षेचा निकाल बारावीचा निकाल जाहीर झाला की लगेचच दोन दिवसात लागू शकतो.

दहावीचा निकाल 15 मे 2025 ला किंवा 16 मे 2025 ला जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. सध्या उत्तर पत्रिकांची पडताळणी सुरु असून हे काम अगदीच युद्ध पातळीवर केले जात आहे यामुळे 11 मे पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती समोर येत आहे.

चालू आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन गुणपत्रिकांची छपाई सुरू होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले गेले आहे. तसेच बोर्डाचा निकाल 11 मेपर्यंत पूर्ण होणार आहे आणि मग त्यानंतर प्रत्यक्षात निकाल लागणार आहे.

13 किंवा 14 मे रोजी बारावीचा आणि दहावीचा निकाल 15 किंवा 16 मे 2025 रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. मात्र बोर्ड परीक्षेच्या निकालाची अधिकृत तारीख राज्याचे शिक्षण मंत्री जाहीर करणार आहेत.

लवकरच राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडून याबाबतची तारीख जाहीर होण्याची शक्यता बोर्डाकडून वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News