11वी ला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल, आता Admission घेतांना ‘ही’ कागदपत्रे लागतील

यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यभर अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली असून या अनुषंगाने विद्यार्थ्यांना काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांना ही कागदपत्रे सबमिट करायची आहेत.

Published on -

11th Admission : पाच मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. काल दुपारी एक वाजता निकाल लागला आणि या निकालात पुन्हा एकदा मुलींनी भाजी मारली. तसेच राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वात बेस्ट राहिला. खरे तर यावर्षी बारावीचा निकाल वेळेच्या आधीच जाहीर करण्यात आला आहे.

दरवर्षी बारावीचा निकाल मे च्या शेवटच्या आठवड्यात लागतो मात्र यावेळी पाच मेलाच निकाल जाहीर करण्यात आला. कारण असे की यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील वेळेच्या आधीच घेण्यात आल्या होत्या. दरम्यान बारावीचा निकाल जाहीर झाला असल्याने आता येत्या काही दिवसांनी दहावीचा देखील निकाल जाहीर होणार आहे.

येत्या आठ दिवसात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मागेच दहावी आणि बारावीचे निकाल 15 मे च्या आत जाहीर होणार असे सांगितले होते.

यानुसार बारावीचा निकाल तर जाहीर झाला आहे आणि आता दहावीचा निकाल देखील 13 ते 15 मे 2025 दरम्यान जाहीर होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरंतर एच एस सी चा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी आणि पालक एसएससी अर्थातच दहावीच्या निकालाची वाट पाहत आहेत.

दरम्यान आजची ही बातमी अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कामाची राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दहावीच्या निकालापूर्वी अकरावी प्रवेशाचा भाग एक आणि दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरण्यात येत असतो.

यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया बदलली आहे. शहरी भागात आणि ग्रामीण भागातही आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांनी इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

महत्त्वाची बाब अशी की अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियाच्या अनुषंगाने केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना काही आवश्यक कागदपत्रे जमवून ठेवावे लागणार आहेत. दरम्यान, शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी कागदपत्रांची यादी सुद्धा जाहीर केली आहे. आता आपण अकरावी प्रवेशासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील याची माहिती पाहणार आहोत.

ही कागदपत्रे लागणार?

अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना काही कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत. जसे की आधार कार्ड, रेशन कार्ड, दहावीचे स्कूल लिविंग सर्टिफिकेट, इयत्ता दहावीचे गुणपत्रक, कास्ट सर्टिफिकेट, इनकम सर्टिफिकेट, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस पात्रता प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र असे कागदपत्र लागणार आहेत. 

ही ऑप्शनल कागदपत्रे सुद्धा लागणार 

याशिवाय काही ठराविक विद्यार्थ्यांना जसे की शासनाच्या एखाद्या प्रकल्पाने बाधित झालेले प्रकल्पग्रस्त आणि भूकंपात बाधित झालेल्यांना भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. आजी- माजी सैनिकांच्या मुलांना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू असणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे प्रमाणपत्र, अनाथ विद्यार्थ्यांना विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांचे प्रमाणपत्र, परदेशातून येणार्‍या विद्यार्थ्यांनी संबंधित देशातील भारतीय दूतावासाची सही व शिक्का असलेले दाखला व गुणपत्रक आणि राज्य शासन किंवा केंद्र शासन किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बदली झालेल्या पालकांच्या पाल्यांसाठी हस्तांतरण आदेश आणि सामीलीकरण पत्र सुद्धा सादर करावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News