अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया बाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ तारखेपासून सुरू होणाऱ ऍडमिशन

Published on -

11th Admission Process : पाच मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात लाखो विद्यार्थ्यांना चांगले यश मिळाले. दरम्यान बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आता उच्च शिक्षणासाठी ऍडमिशन घेणार आहेत अन त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे.

येत्या काही दिवसांनी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा सुद्धा निकाल लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल 13 ते 15 मे 2025 दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.

बारावीचा निकाल लागला की साधारणता एका आठवड्यात दहावीचा निकाल लागतो आणि यामुळेच 13 मे पर्यंत दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

स्वतः राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सुद्धा दहावी आणि बारावीचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होणार असल्याचे बारावीच्या निकाला आधी सांगितले होते. म्हणजेच दहावीचा निकाल आता लवकरच जाहीर होणार असून अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया बाबत सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

कधी सुरू होणार 11 वी ची प्रवेश प्रक्रिया ?

दहावीचा निकाल अजून जाहीर झालेला नाही. पण त्याआधीच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने व गुणवत्तेनुसार होणार आहे.

राज्यातील सर्वच्या सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात ही प्रक्रिया ऑनलाइन होईल अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान आता अकरावीच्या प्रवेशासाठीची कार्यपध्दतीही ठरविण्यात आली असून याचे वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाविद्यालयांमध्ये तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही येत्या आठ तारखेपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे.  

कस आहे संपूर्ण वेळापत्रक? 

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर आठ तारखेपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून आठ पासून ते 15 मे 2025 पर्यंत शाळा, महाविद्यालयांची माहिती संकेतस्थळावर भरणे व अद्यावत करण्यासाठी मुदत दिली गेली आहे.

तसेच, उच्च माध्यमिकच्या शाखांची माहिती प्रमाणित करण्यासाठी 8 ते 16 मे असा कालावधी देण्यात आलाय अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान ही सर्व प्रोफाइल रेडी झाल्यानंतर अकरावी मध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रोफाईल तयार केले जाणार आहे आणि यासाठी 19 तारखेपासून सुरुवात होणार आहे.

19 पासून ते 28 मे पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. तसेच, विद्यार्थ्यांना 19 ते 28 मे या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरता येणार अशी माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यापुर्वी शुन्य फेरी – व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक व इनहाऊस कोट्यातील प्रवेश निश्चित करता येईल अशीही माहिती देण्यात आली आहे. मात्र अजून शिक्षण विभागाकडून अकरावीच्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही पण हे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने जाहीर होण्याची शक्यता आहे.

सर्व फेरीमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचे ऍडमिशन पूर्ण झालेत की मगच अकरावीचे वर्ग सुरू केले जातील असे बोलले जात असून 11 ऑगस्ट 2025 पासून अकरावीचे वर्ग सुरू होतील असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe