Stock To Buy : तुम्ही पण या नव्या वर्षात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. आज आपण अशा काही शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत जे की, या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 54% पर्यंत रिटर्न देण्याची क्षमता ठेवतात. यामुळे जर तुम्हालाही या नव्या वर्षात तुमचा पोर्टफोलिओ अधिक मजबूत बनवायचा असेल तर नक्कीच तुम्ही टॉप ब्रोकरेजने सुचवलेल्या या शेअर्स बाबत विचार करू शकता. खरे तर 2025 हे वर्ष शेअर मार्केट साठी मोठे निराशाजनक राहिले आहे.
गेल्यावर्षी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाली आणि या चढउताराचा फटका लाखो गुंतवणूकदारांना बसला. गेल्या वर्षात अनेक शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न दिलेत. त्यामुळे सध्या गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात अस्वस्थ आहेत. मागील वर्षे हे स्मॉल कॅप शेअरसाठी कठीण राहिले. स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये गेल्या वर्षी तब्बल सहा टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. निफ्टीच्या तुलनेत या इंडेक्सची कामगिरी काहीशी निराशाजनक राहिली आणि गुंतवणूकदारांचे यामुळे मोठे नुकसान झाले. मात्र हे 2026 वर्ष स्मॉल कॅप शेअर साठी फायद्याचे ठरणार आहे. ऍक्सीस सेक्युरिटीज या ब्रोकरेज हाऊसने या संदर्भात एक नवा अहवालचारी केला आहे. दरम्यान या ब्रोकरेज हाऊसने सुचवलेल्या शेअर्स पैकी आज आपण टॉप पाच शेअर्स बाबत माहिती पाहूयात.

हे शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल
कल्पतरू प्रोजेक्ट इंटरनॅशनल : या कंपनीला पॉवर ट्रान्समिशन आणि सोलर क्षेत्रातील काही नव्या ऑर्डर्स प्राप्त झालेल्या आहेत. यामुळे या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना येत्या काळात सोन्याचे दिवस पाहायला मिळू शकतात. या कंपनीच्या शेअर्समध्ये यंदा 24 टक्क्यांपर्यंतची वाढ होणार असा अंदाज आहे. यासाठी ब्रोकरेज हाऊसने 1475 रुपयांचे टार्गेट प्राईस सेट केलेले आहे.
Chalet Hotels : शेअर मार्केट गुंतवणूकदारांना हॉटेल इंडस्ट्रीजच्या या शेअर्समधून चांगली कमाई होऊ शकते. हॉटेल अक्षत्रातील ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना यंदा चांगली कमाई करून देण्याची क्षमता ठेवते असा विश्वास ब्रोकरेज हाऊसने व्यक्त केला आहे. या स्टॉक साठी 1120 रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे करंट मार्केट प्राइस पेक्षा ही किंमत 29 टक्के अधिक आहे म्हणजेच 2026 मध्ये या शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 29 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतील असा ब्रोकरेज हाऊसचा अंदाज आहे.
महानगर गॅस : या यादीत महानगर गॅसच्या शेअरचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. या स्टॉकसाठी ब्रोकरेज हाऊसने 1540 रुपयांची टारगेट प्राईस सेट केली आहे. करंट मार्केट प्राइस पेक्षा ही किंमत 36 टक्के अधिक आहे.
किर्लोस्कर ब्रदर्स : 2026 मध्ये हा स्टॉक सुद्धा गुंतवणूकदारांना चांगला पैसा कमवून देणार आहे. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, या स्टॉकच्या किमती या वर्षात 45 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. या शेअर साठी ब्रोकरेज हाऊस कडून 2330 रुपयांची टारगेट प्राईस सेट करण्यात आली आहे.
आयनॉक्स विंड : हा स्टॉक सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना या वर्षात मोठा नफा मिळवून देणार असा ब्रोकरेज हाऊसचा अंदाज आहे. ब्रोकरेज हाऊसने हा स्टॉक या वर्षात 54 टक्क्यांपर्यंत रिटर्न देईल असा अंदाज दिला आहे. या स्टॉक साठी 190 रुपयांची टार्गेट प्राईज सेट करण्यात आली आहे.













