ICICI Bank, TCS समवेत ‘हे’ 5 स्टॉक लॉन्ग टर्ममध्ये देणार जबरदस्त परतावा ! 67% रिटर्न…. टॉप ब्रोकरेजचा सल्ला

21 फेब्रुवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. परंतु या घसरणीच्या काळात सुद्धा अनेक कंपन्यांचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरले असून टॉप ब्रोकरेज कडून लॉन्ग टर्म साठी आयसीआयसीआय बँक, टीसीएससमवेत असे 5 स्टॉक सुचवण्यात आले आहेत जे की आपल्या गुंतवणूकदारांना 67% पर्यंतचे रिटर्न देऊ शकतात.

Published on -

5 Stock To Buy : शेअर बाजारात सध्या घसरण होत असल्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. 21 फेब्रुवारी 2025 रोजी देखील भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आले. ट्रेडच्या सुरवातीला 30-share BSE बेंचमार्क सेन्सेक्समध्ये 202.21 अंकांची घसरण झाली अन 75,533.75 वर पोहचले. NSE निफ्टी सुद्धा 63.5 पॉईंट्सने घसरून 22,849.65 वर आले.

दुपारी 1.40 वाजता, बीएसई सेन्सेस 0.80 टक्के घसरून 75,112.78 वर खाली आला तर निफ्टी फिफ्टी 0.77 टक्क्यांनी घसरून 22,734.65 खाली आले. मात्र शेअर बाजारातील आजची ही घसरण उद्याची संधी तयार करू शकते.

या घसरणीच्या काळात देखील असे काही स्टॉक आहे जे लॉंग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देताना दिसतील असा विश्वास टॉप ब्रोकरेज कडून वर्तवण्यात आला आहे.

टॉप ब्रोकरेज फर्म मिराई ऍसेट शेयरखानने ICICI Bank, TCS समवेत 5 असे स्टॉक सुचवले आहे जे की आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना 67% पर्यंतचे रिटर्न देऊ शकतात असा अंदाज वर्तवला आहे. आता आपण या टॉप ब्रोकरेज फर्मने लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी कोणते 5 स्टॉक सुचवले आहेत? याची माहिती जाणून घेणार आहोत.

आयसीआयसीआय बँक : आयसीआयसीआय बँकेचे स्टॉक सध्या 1250.3 रुपयांवर ट्रेड करताय. पण या स्टॉक साठी 1550 रुपयांचे टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आले आहे. अर्थातच हा स्टॉक 26 टक्क्यांनी वाढू शकतो अंदाज आहे.

टीसीएस : या यादीत दुसऱ्या क्रमांकावर टीसीएस कंपनीच्या स्टॉकचा समावेश होतो. टाटा समूहाचा टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस हा स्टॉक सध्याच्या किमतीपेक्षा 38% परतावा देऊ शकतो. या स्टॉकसाठी ब्रोकरेज कडून 5230 रुपयांची टारगेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.

गोदरेज कंजूमर प्रॉडक्ट : गोदरेज कंजूमर प्रॉडक्ट कंपनीचा स्टॉक या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येतो. हा स्टॉक सध्याच्या किमतीपेक्षा 56 टक्क्यांनी परतावा देणार असा अंदाज आहे. या स्टॉक साठी 1675 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.

Oberoi Realty : हा या यादीतला चौथा स्टॉक आहे. हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना 67% पर्यंतचे रिटर्न देऊ शकतो. या स्टॉक साठी टॉप ब्रोकरेजने 2694 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे.

Varun Beverages : हा या यादीतला पाचवा स्टॉक आहे. सध्याच्या किमतीपेक्षा हा स्टॉक 60 टक्क्यांनी रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो. यासाठी 750 रुपयांचे टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe