500 Rupees Note : पंतप्रधानपदाचे आणि दिल्लीचे सूत्र माजी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातात गेले अन देशात असे अनेक निर्णय झालेत ज्यामुळे संपूर्ण देशात वादंग पेटले. नरेंद्र मोदी आपल्या पहिल्या कार्यकाळापासून अनपेक्षित निर्णय घेण्यात आघाडीवर आहेत. दरम्यान त्यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता.
त्यावेळी चलनात असणाऱ्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करून त्यांनी नव्याने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारात उतरवल्या होत्या. देशाच्या मध्यवर्ती बँकेला अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाला भारतीय चलन छापण्याचा अधिकार आहे तसेच ते मार्केटमधून हटवण्याचा सुद्धा अधिकार आहे.

दरम्यान याच अधिकाराचा वापर करून आरबीआयने नव्याने सुरू झालेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा सुद्धा चलनातून हटवल्या आहेत. आरबीआयकडून तर अलीकडेच आलेली 2 हजार रुपयांची नोट चलनातून हटवण्यात आली असून या नोटा पुन्हा वापस मागवल्या जात आहेत. आत्तापर्यंत बहुसंख्य लोकांनी या नोटा जमा केल्या आहेत.
फक्त काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांकडे दोन हजार रुपयांची नोट शिल्लक असेल जी की लवकरात लवकर त्यांनी आरबीआयकडे जमा करणे आवश्यक आहे. दरम्यान अशी ही परिस्थिती असतानाच आता आरबीआय कडून आणखी एक महत्त्वाचे सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. आरबीआयने पाचशे रुपयांच्या नोटांबाबत एक सर्क्युलर जारी केल आहे.
काय आहे संपूर्ण डिटेल्स ?
खरेतर, नव्याने सुरू करण्यात आलेली दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद झाल्यानंतर नवीन पाचशे रुपयांची नोट सुद्धा चलनातून बाद करण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू आहेत. RBI पाचशे रुपयांची नोट बंद करू शकते असा सुद्धा अनेकांचा समज आहे.
यामुळे सर्वसामान्य नागरिक आधीच खूपच घाबरलेले आहेत आणि यातच आता सोशल मीडियावर 500 रुपयांच्या ‘स्टार’ चिन्ह असलेल्या नोटांबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चांना उधाण आले आहे. काही जण या नोटा नकली आहेत असा दावा करतांना दिसत आहेत अन यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले असून नागरिक संभ्रमअवस्थेत आहेत.
यामुळे ज्या लोकांकडे स्टार असलेली पाचशे रुपयांची नोट आहे त्यांच्याकडून याबाबत सातत्याने विचारणा केली जात आहे. आता याच साऱ्या पार्श्वभूमीवर देशाच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिकृत सर्कुलर जारी करून स्पष्टीकरण दिलं आहे. आरबीआयने जारी केलेल्या या महत्त्वाच्या सर्क्युलर नुसार, ‘स्टार’ असलेल्या ५०० रुपयांच्या नोटा पूर्णपणे वैध आहेत.
RBI ने याबाबत अधिक माहिती देताना असे सांगितले की, नोटा छापताना काही वेळा त्रुटीमुळे काही नोटा रद्द केल्या जातात. त्याऐवजी जे नवीन नोटा छापल्या जातात, त्यांच्यावर ‘स्टार’ चिन्ह असतं. यामुळे त्या नोटा मूळ गड्डीत बदल म्हणून जोडल्या जातात. म्हणून हे चिन्ह राहिले म्हणजे ती नोट नकली आहे, हा जो समज तयार झालाय तो पूर्णपणे चुकीचा आहे, असं RBI ने यावेळी स्पष्ट केल आहे.
आरबीआयने या जारी केलेल्या महत्त्वाच्या परिपत्रकात असे सुद्धा नमूद केले आहे की, या प्रणालीची सुरुवात आताच झाली आहे असे काही नाही तर ह्या प्रणालीची सुरुवात ही जवळपास 2006 मध्ये झाली आहे. दरम्यान आजही तीच पद्धत लागू असल्याचे स्पष्टीकरण आरबीआय कडून देण्यात आले आहे.
हेच कारण आहे की सध्या सोशल मीडियामध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत त्याकडे नागरिकांनी लक्ष देऊ नये आणि अशा अफ़वापासून सावध राहावे असे आवाहन जाणकार लोकांकडून करण्यात आले असून नागरिकांनी अशा नोटा स्वीकारायला कुठलाही संकोच करू नये असे आवाहन आरबीआय मधील अधिकारी करत आहेत.
याशिवाय, ज्या लोकांनी अजून दोन हजार रुपयांच्या नोटा बदललेल्या नसतील तर त्यांनी 2000 रुपयांच्या नोटा लवकरात लवकर बदलून घ्याव्यात या नोटा अजूनही बँकांमध्ये किंवा RBI च्या कार्यालयात जमा करता येतात अशी माहिती आरबीआयकडून हाती आली आहे.