7th Pay Commission : केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित NDA आघाडीने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. दरम्यान मोदी सरकार आपल्या या तिसऱ्या कार्यकाळात केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेणार असे म्हटले जात आहे.
महागाई भत्ता वाढी संदर्भात देखील लवकरच केंद्रातील मोदी सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला होता.

ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. जानेवारी 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% एवढा झाला आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2024 पासून पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे.
यावेळी DA आणि DR 3% ने वाढवला जाऊ शकतो असे एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. दरवर्षी केंद्रातील सरकारकडून मार्च आणि सप्टेंबर महिन्यात महागाई भत्ता वाढवला जात असतो.
मार्च महिन्यात जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवला जातो आणि सप्टेंबर महिन्यात जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवला जात असतो.
यानुसार मार्च 2024 मध्ये जानेवारी 2024 पासूनचा महागाई भत्ता वाढवण्यात आला असून हा भत्ता 50% झाला आहे. आता सप्टेंबर महिन्यात जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवला जाणारा असून हा भत्ता 53% एवढा होईल अशी शक्यता आहे.
म्हणजेच यावेळी डीए तीन टक्क्यांनी वाढणार आहे. दरम्यान आता आपण महागाई भत्ता 53% झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
किती वाढणार पगार ?
ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे त्यांना 3% डीए वाढ मिळाल्यानंतर पगारात 540 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजे त्याचा वार्षिक पगार ६,४८० रुपयांनी वाढणार आहे.
तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56,900 रुपये आहे त्यांच्या पगारात डीए रिव्हिजननंतर 1,707 रुपयांनी वाढ होणार आहे. म्हणजे वार्षिक पगार 20,484 रुपयांनी वाढणार आहे.
खरे तर गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक सहा महिन्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढत आहे. मात्र यावेळी परिस्थिती काही भिन्न आहे. यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता फक्त तीन टक्क्यांनी वाढणार असे म्हटले जात आहे.