7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारच्या 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी यंदाची दिवाळी अतिशय गोड ठरणार आहे. कारण की, पुढल्या महिन्यात त्यांची एक मागणी पूर्ण होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना पुन्हा एकदा डीएवाढीची भेट मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महागाई भत्ता वाढीचा निर्णय नेमका कधी होणार याची संभाव्य तारीख सुद्धा समोर आली आहे.

15 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न होणार आहे. याच बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे.
सध्या कर्मचाऱ्यांना 55% दराने महागाई भत्ता मिळतोय. ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स (AICPI) च्या जानेवारी – जूनमधील आकडेवारीच्या आधारे DA मध्ये 3% वाढ निश्चित झाली आहे. यानुसार, महागाई भत्ता 58% पर्यंत वाढणार आहे.
विशेष म्हणजे, ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा थकबाकी लाभही मिळणार आहे.
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार वाढीनंतर दरमहा 1,347 रुपयांनी वाढला, तर त्याला 4,041 रुपयांची थकबाकी मिळणार आहे. नक्कीच महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनसचे काम करणार आहे.
त्यामुळे सणासुदीच्या हंगामात कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महागाई भत्ता 58% झाल्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचीही चर्चा जोर धरू लागली आहे.
नियमांनुसार, DA 50% च्या पुढे गेल्यावर तो मूळ पगारात समाविष्ट केला जातो आणि पुढील वेतन आयोगाची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही वाढ कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणार असून वाढत्या महागाईच्या दबावाला तोंड देण्यासाठी मोठा दिलासा ठरणार आहे. पण अजूनच सरकारमधील कोणत्याच नेत्याने 15 ऑक्टोबरला याबाबतचा निर्णय होणार अशी माहिती दिलेली नाही.
यामुळे खरच 15 ऑक्टोबरला केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार का आणि या बैठकीत महागाई भत्ता वाढीवर शिक्कामोर्तब होणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.