आनंदाची बातमी : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या ‘या’ भत्यात मोठी वाढ ! वाचा सविस्तर

राज्य शासकीय सेवेतील कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा एक महत्वाचा भत्ता नुकताच सुधारित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

Published on -

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणारे राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 55 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय मात्र राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही 53% दराने महागाई भत्ता मिळत आहे. यामुळे राज्य कर्मचारी लवकरात लवकर आम्हाला ही महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळायला हवा अशी मागणी करत आहे.

दरम्यान मीडिया रिपोर्ट्स मध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या चालू महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात वाढवला जाऊ शकतो आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू केली जाऊ शकते असा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने गेल्या महिन्यात म्हणजे जून महिन्यात एक जीआर काढला होता या जीआर नुसार सामान्य प्रशासन विभागातील राज शिष्टाचार उपविभागाच्या अधिनस्त येणाऱ्या राज्य अतिथी गृहातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा गणवेशाचा भत्ता वाढवण्यात आला आहे.

यामुळे या संबंधित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आलेला हा शासन निर्णय नेमका कसा आहे याचा संपूर्ण आढावा या ठिकाणी घेणार आहोत.

सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय कसा आहे?

खरे तर सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार उपविभागाच्या अधिनस्त येणाऱ्या राज्य अतिथी गृहातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा गणवेश भत्ता वाढवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

यानुसार गेल्या महिन्याच्या वीस तारखेला सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून एक जीआर जारी करण्यात आला ज्यामध्ये या संबंधित कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एकदा प्रति कर्मचारी एकूण तीन गणवेश शासन निर्णयात नमूद केलेल्या सुधारित दरानुसार मंजूर करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या शासन निर्णयानुसार सह्याद्री आणि नंदगिरी राज्य अतिथी गृह येथे कार्यरत असणाऱ्या राज्य अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांना सुधारित दराने गणवेश भत्ता मिळणार आहे. आता आपण या संबंधित कर्मचाऱ्यांचा पदानुसार सुधारित गणेश भत्ता कसा राहणार आहे हे पाहूयात.

सुधारित गणवेश भत्ता कसा आहे?  

व्यवस्थापक पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 9000 रुपये प्रति गणवेश इतका भत्ता मिळणार आहे. याशिवाय सह व्यवस्थापक, मुख्य बटलर आणि भांडारपाल या तीन पदांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 8450 प्रति गणवेश इतका भत्ता मिळणार आहे.

बटलर पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 5850 प्रति गणवेश इतका भत्ता मिळणार आहे. खानसामा पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 5200 प्रति गणवेश इतका भत्ता मिळणार आहे. किचन हेल्पर, स्टोअर मन आणि शिपाई या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 3900 प्रति गणवेश इतका भत्ता मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!