गुड न्युज ! केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% होणार, पगार किती वाढणार ? वाचा….

Tejas B Shelar
Published:

7th Pay Commission DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जर तुम्हीही केंद्रीय कर्मचारी म्हणून कार्यरत असाल तर तुम्हाला लवकरच केंद्रातील सरकारकडून एक मोठी भेट मिळणार आहे. ती म्हणजे केंद्रातील सरकारी नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता आता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे. महागाई भत्त्यात म्हणजे DA मध्ये दरवर्षी दोनदा वाढ केली जात असते.

जानेवारी अन जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवला जात असतो. यानुसार जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढला आहे. आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. मात्र, याची घोषणा सप्टेंबरमध्ये केली जाईल.

महागाई भत्ता हा एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार वाढवला जातो. जानेवारी ते जून या काळातील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार DA वाढ ठरवली जाणार आहे. आतापर्यंत में महिन्यापर्यंतची आकडेवारी समोर आली आहे.

जून महिन्याचे आकडे अद्याप जाहीर झालेले नाहीत. पण लवकरच हे आकडे समोर येणार आहेत. हे आकडे समोर आल्यानंतर प्रत्यक्षात महागाई भत्ता किती वाढणार हे स्पष्ट होणार आहे.

अशातच जाणकार लोकांनी 7 व्या वेतन आयोगांतर्गत यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होणार अशी शक्यता वर्तवली आहे.

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतचा निर्णय सप्टेंबर मध्ये घेतला जाणार असला तरी देखील महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासूनच लागू केली जाणार आहे.

आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण महागाई भत्ता 53 टक्के झाल्यावर पगार किती वाढणार हे समजून घेणार आहोत.

पगार कितीने वाढणार ?

महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढल्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कितीने वाढ होणार हे आता आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन आणि ग्रेड पे 45,700 रुपये असेल तर त्याला सध्या म्हणजे 50 टक्के दराने 22,850 रुपये महागाई भत्ता मिळतोय.

मात्र, जेव्हा महागाई भत्ता 53 टक्के होईल तेव्हा त्यांना 24,221 रुपये मिळणार आहेत. म्हणजे दरमहा १३७१ रुपये अधिक मिळणार आहेत. अर्थातच पगार 1371 रुपयांनी वाढणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe