7th Pay Commission DA Hike : मार्च 2025 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासून ही महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली.
म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळाली होती. दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेला या निर्णयानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य सरकारकडून तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जातोये.

मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान गुजरात आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55 टक्के एवढा करण्यात आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित करण्यात आला आहे.
अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55 टक्के एवढा झाला असून ही वाढ सुद्धा जानेवारी 2025 पासून लागू झाली आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्रातील आणखी काही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित झालाय.
या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला
केंद्र सरकारच्या वित्त व व्यय विभाग नवी दिल्ली यांच्या 02 एप्रिल 2025 रोजीच्या पत्रानुसार, महाराष्ट्र राज्यांमधील विधी व न्यायिक विभाग अंतर्गत कार्यरत अधिकारी यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवण्यात आला आहे. आज 28 मे 2025 रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात.
विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून हा जीआर निघाला असून या निर्णयानुसार, राज्यातील न्यायालयातील न्यायिक अधिकारी तसेच न्यायिक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना 2% डीए वाढ लागु करण्यात आली आहे. अर्थातच या संबंधित कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 53 टक्क्यांवरून 55 टक्के इतका झाला आहे.
महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळणार
विधी व न्याय विभागाकडून जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार या विभागातील न्यायिक अधिकाऱ्यांचा तसेच न्यायिक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्के इतका करण्यात आला आहे.
ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली आहे. अर्थातच या संबंधित कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे. नक्कीच या निर्णयामुळे संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना कधी मिळणार महागाई भत्ता वाढीचा लाभ?
महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना देखील लवकरच महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे.
पुढील महिन्याच्या पंधरा तारखेला या संदर्भातील निर्णय होईल अशी अपेक्षा असून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा 53 टक्क्यांवरून 55 टक्के होणार आहे आणि ही वाढ देखील जानेवारी महिन्यापासूनच लागू राहील.