7th Pay Commission DA Hike : नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली. केंद्रातील सरकारने याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात घेतला असून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा देण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर आता देशातील विविध राज्य सरकारांच्या माध्यमातून त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता वाढवला जातोय. अशातच आता हरियाणा सरकारने तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

हरियाणा सरकारने तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 53 टक्क्यांवरून 55 टक्के एवढा केला आहे. हरियाणा राज्य शासनाच्या वित्त विभागाने याबाबतचा निर्णय घेतला असून ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली आहे.
या राज्य कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पगारासोबतच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असून या पगारांसोबत त्यांना महागाई भत्ता फरक सुद्धा मिळणार आहे. संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे.
यामुळे हरियाणा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून या निर्णयाचे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब अशी की याआधी गुजरात राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवण्यात आला.
गुजरात राज्यातील सहावा वेतन आयोग आणि सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अनुक्रमे 6 % आणि दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. महत्त्वाची बाब अशी की ही महागाई भत्ता वाढ सुद्धा जानेवारी 2025 पासूनच लागू करण्यात आली आहे.
म्हणजेच या कर्मचाऱ्यांना सुद्धा तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे. फक्त गुजरातच नाही तर उत्तर प्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा जानेवारी 2025 पासून 53 टक्क्यांवरून 55% एवढा करण्यात आला असून या संबंधित निर्णयामुळे राज्यातील लाखो राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
राजस्थान मधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 53 टक्क्यांवरून 55 टक्के करण्यात आला असून ही वाढ सुद्धा 1 जानेवारी 2025 पासून प्रभावी राहणार आहे.
एकंदरीत देशातील विविध राज्य सरकारांच्या माध्यमातून तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातोय आणि यामुळेच महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय सेवेतील कर्मचारी देखील महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे.