‘या’ 9.59 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला ! किती वाढला DA ? वाचा….

केंद्रातील मोदी सरकारने मार्च महिन्यात एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2025 पासून लागू झाली आहे. दरम्यान केंद्राच्या या निर्णयानंतर आता देशातील विविध राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातोय.

Published on -

7th Pay Commission DA Hike : केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला. केंद्रातील सरकारच्या माध्यमातून दरवर्षी मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जात असतो. होळी सणाच्या आसपास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो.

यंदाही मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. हा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला असून याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात झाला असला तरी देखील ही वाढ जानेवारी महिन्यापासूनच लागू झाली आहे. केंद्र शासनाच्या निर्णयानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के इतका झाला आहे.

दरम्यान केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर आता विविध राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जात आहे. अशातच आता देशातील जवळपास 9.59 लाख राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय झाला आहे.

या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला

मिळालेल्या माहितीनुसार गुजरात राज्य सरकारने तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर गुजरात राज्य सरकारने आपल्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के इतका केला आहे.

महत्त्वाचे म्हणजे याबाबतचा निर्णय एप्रिल 2025 मध्ये झाला असला तरी देखील ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहणार आहे. म्हणजेच गुजरात राज्यातील संबंधित 9.59 लाख राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे.

महत्त्वाची बाब अशी की गुजरात राज्य सरकारच्या आधी राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडीसा आणि आसाम या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवण्यात आला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, 7 वा वेतन आयोग आणि सहाव्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला.

या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अनुक्रमे दोन टक्क्यांनी आणि सहा टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेले DA चे नवीन दर 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडीसा, आसाम आणि आता गुजरात राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 53 टक्क्यांवरून 55% कधी होणार हा सवाल उपस्थित होतोय.

दरम्यान येत्या काही दिवसांनी याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला की साधारणतः तीन ते चार महिन्यांनी महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe