सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! 7 वर्षात पहिल्यांदा असं घडणार की….

गेल्यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला होता मात्र यावेळी सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) अवघा 2 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणून जर यावेळी हा दर 2 टक्केच राहिला, तर जून 2018 नंतर मिळणारा हा सर्वात कमी महागाई भत्ता ठरेल.

Published on -

7th Pay Commission DA Hike : देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यंदाचा महागाई भत्ता अपेक्षेपेक्षा कमी राहणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे देशातील जवळपास 1.15 कोटी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे.

गेल्यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला होता मात्र यावेळी सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) अवघा 2 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही वर्षांत हा दर 3 ते 4 टक्क्यांच्या दरम्यान राहिला होता.

जुलै 2024 पासून देखील महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला होता. मात्र यावेळी हा भत्ता फक्त दोन टक्के वाढणार असे म्हटले जात आहे. म्हणून जर यावेळी हा दर 2 टक्केच राहिला, तर जून 2018 नंतर मिळणारा हा सर्वात कमी महागाई भत्ता ठरेल.

ऑल इंडिया कंझ्युमर प्राईज इंडेक्सच्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्यातील वाढीचा हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे देशभरातील सुमारे 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक झळ बसण्याची शक्यता आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणि महागाईच्या दराचा विचार करता, कर्मचाऱ्यांना यंदा अपेक्षेपेक्षा कमी वाढ मिळणार असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता (DA) आणि महागाई राहत (DR) जाहीर करते. जानेवारी आणि जुलै महिन्यात हा दर सुधारित केला जातो. मागील जुलैमध्ये डीए 3 टक्क्यांनी वाढवून 50 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत नेण्यात आला होता.

त्याआधी मार्च 2024 मध्ये डीए 4 टक्के वाढून 46 वरून 50 टक्के करण्यात आला होता. ऑक्टोबर 2024 मध्येही 3 टक्क्यांनी वाढ करत डीए 53 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. मात्र, यंदा ही वाढ अवघी 2 टक्क्यांवर राहिल्यास, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे.

महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना पुरेसा महागाई भत्ता मिळावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे. आगामी काळात सरकारकडून यावर काय निर्णय घेतला जातो, याकडे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष लागले आहे.

नक्कीच जर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता यावेळी फक्त दोन टक्क्यांनी वाढला तर ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी चिंतेची बातमी राहणार आहे यामुळे वाढत्या महागाईतुन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe