7th Pay Commission DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकताच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे. दरम्यान आता राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. खरेतर केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला, याअंतर्गत केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यामध्ये 2 टक्के वाढ झाली.
ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली. म्हणून अनेकांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता कधी मिळणार ? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय.

दरम्यान आता याच संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट हाती आलं आहे. अशा परिस्थितीत, आज आपण राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार? यात किती वाढ होणार? ही वाढ कधीपासून लागू होणार ? याचा आढावा घेणार आहोत.
राज्य कर्मचाऱ्यांचा DA किती वाढणार?
खरेतर, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. पहिला लाभ मार्च महिन्यात आणि दुसरा लाभ साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात केला जातो.
महत्त्वाची बाब म्हणजे ही महागाई भत्ता वाढ अनुक्रमे जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून लागू केली जाते. दरम्यान केंद्रातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळतो.
आता केंद्र सरकारने 01 जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 02 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला आहे. ही वाढ डीए फरकासह लागू करण्यात आली आहे अन आता साहजिकच आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा या वाढीचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली सदर वाढीव महागाई भत्ता एप्रिल महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत वितरीत करण्यात आलेली आहे.
आता राज्य कर्मचाऱ्यांना जुन ते जुलै दरम्यान महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. वास्तविक सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला की तीन ते चार महिन्यांनी राज्य कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत असतो.
यानुसार जून किंवा जुलै 2025 मध्ये महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मंजूर केला जाईल अशी माहिती समोर येत आहे. यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 2% DA वाढ लागू केली जाणार आहे.
DA वाढीचा अन फरकाचा सुद्धा लाभ मिळणार
राज्य कर्मचाऱ्यांना जुनं महिन्यात डीए वाढीचा लाभ मिळू शकतो. DA वाढीचा लाभ जून महिन्यात मंजूर केला जाणार असला तरी देखील ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू होणार आहे. अर्थात जून महिन्यात याबाबतचा निर्णय झाला तर राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी ते जून या काळातील महागाई भत्ता फरकाचा सुद्धा लाभ मिळणार आहे.