7th Pay Commission : ब्रेकिंग ! कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात 18 महिने कालावधीतील महागाई भत्ता थकबाकी जमा ?

Ajay Patil
Published:
7th pay commission

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आले आहे. कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शासनाकडून थांबवण्यात आला होता. जवळपास सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिने महागाई भत्ताचा लाभ देण्यात आलेला नाही. म्हणजेच कर्मचाऱ्यांचा 18 महिने कालावधीचा महागाई भत्ता शासनाकडून रोखून धरण्यात आला होता.

विशेष म्हणजे या कालावधीत सरकारी कर्मचारी कामावर असताना देखील महागाई भत्ता गोठवण्यात आला आहे. यामुळे सदर कालावधीतील महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करणे हे कायद्याने बंधनकारक असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात असून सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिने कालावधी मधील महागाई भत्ता थकबाकी लवकरात लवकर दिली जावी यासाठी कर्मचारी युनियन कडून वारंवार मागणी देखील केली जात आहे.

एक तर सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी दिली जावी नाहीतर याची वन टाइम सेटलमेंट केली जावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान आता कोरोना काळातील 18 महिने महागाई थकबाकी बाबत एक महत्त्वाचा अपडेट हाती आल आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून 18 महिने कालावधी मधील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता थकबाकी बाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. याचं कारण असं की गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी सरकारकडून सदर निर्णय घेतला जाणार आहे.

सध्या विधानसभा निवडणुका या दोन राज्यात जवळ येत असल्याने कर्मचाऱ्यांचा बहुचर्चित मुद्दा म्हणजेच कोरोना काळातील 18 महिने महागाई भत्ता थकबाकी आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत केंद्र सरकारकडून योग्य तो निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास आणि महागाई भत्ता थकबाकी जारी केल्यास किंवा वन टाइम सेटलमेंट केल्यास कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे.

वन टाईम सेटलमेंट केल्यास एकदाच महागाई भत्ता मध्ये चार ते पाच टक्के वाढ दिली जाऊ शकते. तसेच महागाई भत्ता थकबाकी अदा केल्यास संपूर्ण थकबाकी कर्मचाऱ्यांना एकदाच दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे एका मीडिया रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे की वित्त विभागाकडून या संदर्भात एक प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

यामुळे कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी किंवा वन टाइम सेटलमेंट च्या आधारे 18 महिने कालावधी मधील महागाई भत्ता थकबाकी वितरित करण्यासाठी हालचाली जोरावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe