राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ‘या’ 16 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढला, किती वाढला डीए? पहा…

केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला. त्यानंतर आता विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित केला जातोय.

Published on -

7th Pay Commission : केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकताच सुधारित करण्यात आला आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गेल्या मार्च महिन्यात घेण्यात आला असून या अंतर्गत लागू करण्यात आलेली महागाई भत्ता वाढ जानेवारी 2025 पासून लागू झाली आहे.

म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळाली आहे. दरम्यान केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून 55% झाल्यानंतर केंद्रातील सरकारच्या धर्तीवर अनेक राज्य सरकारांनी देखील त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, ओडिशा, गुजरात, हरियाणा, राजस्थान सरकारने तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानंतर या संबंधित राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांसारखाच 55% इतका झाला असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू आहे. दुसरीकडे आता देशातील आणखी एका महत्त्वाच्या राज्याने तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे.

या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, ओडिशा, गुजरात, हरियाणा, राजस्थान सरकार नंतर आता तामिळनाडू राज्यातील राज्य सरकारने तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या राज्य कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेला नवीन महागाई भत्ता एक एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आला आहे.

दरम्यान तामिळनाडू सरकारच्या निर्णयानंतर जवळपास 16 लाख राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार असून यामुळे संबंधितांच्या माध्यमातून शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. या निर्णयाचा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच पेन्शन धारकांना सुद्धा फायदा होणार असून पेन्शन धारकांनी देखील शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. महत्वाची बाब म्हणजे यासाठी वार्षिक 1252 कोटी रुपयांच्या अतिरिक्त वाटपास मान्यता सुद्धा देण्यात आली आहे.

फेस्टिवलं ऍडव्हान्स पण वाढला 

तमिळनाडू राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा फक्त महागाई भत्ताच वाढला आहे असे नाही तर त्यांचा फेस्टिवल ऍडव्हान्स भत्ता सुद्धा वाढला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना दिला जाणारा दहा हजार रुपयांचा फेस्टिवल ऍडव्हान्स आता वीस हजार रुपये इतका करण्यात आला.

तसेच या वर्षापासून उच्च शिक्षणातील मुलांना दिला जाणारा एज्युकेशनल ॲडव्हान्स 1,00,000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच, कला, विज्ञान आणि पॉलिटेक्निकसाठी हा भत्ता 50,000 रुपयांपर्यंत वाढवला जाणार आहे. एवढेच नाही तर तमिळनाडू सरकारच्या माध्यमातून पेन्शन धारकांसाठी सुद्धा मोठा निर्णय घेण्यात आला आहे

या नव्या निर्णयाच्या माध्यमातून आता राज्यातील सेवानिवृत्त सी अँड डी श्रेणीतील कर्मचारी, वैयक्तिक पेन्शनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांचा दरवर्षीचा पोंगल फेस्टिव्हल बोनस 500 रुपयांवरून 1000 रुपयांवर वाढवण्यात आला आहे. पेन्शन धारकांचा फेस्टिवल ऍडव्हान्स सुद्धा 4000 रुपयांवरून 6,000 रुपये इतका करण्यात आला आहे. दरम्यान शासनाच्या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त दबाव येणार आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय संबंधित राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासादायक राहणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe