7th Pay Commission : सातव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत मात्र हा नवीन आठवावेतन आयोग लागू होण्याआधीच देशभरातील एक कोटी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना केंद्रातील मोदी सरकारकडून आणखी एक मोठी भेट मिळणार आहे.
परत एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता वाढवण्यात येणार आहे. खरंतर एका वर्षात महागाई भत्ता दोनदा वाढवला जात असतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित केला जातो.

मात्र याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हा उशिराने निघतो. जानेवारी महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीचा शासन निर्णय हा साधारणतः मार्च महिन्यात आणि जुलै महिन्यापासून च्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा साधारणता दसरा दिवाळीच्या दरम्यान निघतो.
2025 बाबत बोलायचं झालं तर या वर्षात जानेवारी 2025 पासून चा महागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला असून याचा शासन निर्णय मार्च महिन्यात निघाला.
या निर्णयानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान आता जुलै महिन्यापासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता किती टक्क्यांनी वाढणारी या संदर्भात नवीन अपडेट सुद्धा समोर आली आहे.
किती वाढणार महागाई भत्ता?
जुलैमध्ये महागाई भत्ता किती वाढेल हे AICPI निर्देशांकाच्या अर्धवार्षिक (जानेवारी ते जून) आकडेवारीवरून स्पष्ट होणार आहे. एआयसीपीआयची आतापर्यंत जानेवारी ते मे या काळातील आकडेवारी समोर आली आहे.
त्यानुसार जानेवारी 2025 मध्ये एआयसीपीआय निर्देशांक 143.2, फेब्रुवारी मध्ये 142.8, मार्चमध्ये 143, एप्रिल मध्ये 143.5 आणि मे मध्ये 144 इतके राहिले आहे. यामुळे DA स्कोअर 57.85 टक्क्यांवर पोहोचला आहे. तथापि, जूनचे आकडे अजून येणे बाकी आहेत, जे की या महिन्याच्या अखेरीस येऊ शकतात असे बोलले जात आहे.
तथापि जानेवारी ते मे या कालावधीमधील आतापर्यंतची आकडेवारी पाहिली असता यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढू शकतो. म्हणजेच जुलै महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून थेट 58 टक्क्यांवर जाणार आहे.
शासन निर्णय कधी निघणार?
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58% होणार असा अंदाज आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे. मात्र याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हा साधारणता दसऱ्याच्या आसपास निघेल.
मात्र ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने त्यावेळी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाचा सुद्धा लाभ मिळणार आहे. विशेष बाब अशी की सातवा वेतन आयोगाची ही शेवटची महागाई भत्ता वाढ सुद्धा ठरण्याची शक्यता आहे कारण की पुढल्या वर्षी नवीन वेतन आयोग लागू होणार असे बोलले जात आहे.