निर्णय झाला ! महाराष्ट्रातील 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ‘या’ महिन्यात वाढवला जाणार, समोर आली मोठी अपडेट 

7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत. खरे तर, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58% करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ झाल्यानंतर राज्य कर्मचारी देखील महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत आणि आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.

खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला. महाराष्ट्रातही अखिल भारतीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला.

अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला की लगेचच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जातो यामुळे लवकरच राज्य कर्मचाऱ्यांना ही महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असे वाटत होते. दिवाळीच्या आधीच राज्य कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी फडणवीस सरकार या संदर्भातील निर्णय घेण्याची शक्यता होती.

प्रत्यक्षात मात्र दिवाळीच्या आधी या संदर्भात सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. दरम्यान आता नवीन अपडेट समोर आली आहे. खरे तर महाराष्ट्राची निवडणूक आयोगाने नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. या निवडणुका एकूण तीन टप्प्यात संपन्न होतील.

दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता लागू झाले आहे आणि यामुळे आचारसंहिता लागू असल्याने आता कोणतेच धोरणात्मक निर्णय सरकारला घेता येणार नाही येत नाही. राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्याबाबतही सरकार निर्णय घेणार नाही.

जोपर्यंत आचारसंहिता कायम आहे तोपर्यंत हा निर्णय होणे अशक्य आहे. अर्थात महागाई भत्ता वाढीसाठी राज्यातील 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना आणखी एक महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. डिसेंबर अखेरीस आचारसंहिता संपणार आहे आणि त्यानंतर महागाई भत्ता वाढीचा निर्णय होणे अपेक्षित आहे.

थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला की राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा GR पण जाहीर केला जाणार आहे. दरम्यान महागाई भत्ता वाढीचा निर्णय कधी पण झाला तरीही ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे.

म्हणजेच एक जुलै 2025 पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना सध्या 55% दराने महागाई भत्ता दिला जातोय तो 58% होणार आहे. अर्थात महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढेल आणि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाचाही लाभ दिला जाणार आहे.